व्हिडीओ कॉल करून तिचे स्क्रॉनशिट काढले अन् एडिट करून अश्लील फोटो व्हायरल... नंतर ब्लॅकमेल सुद्धा...

मुंबई तक

एका तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून जवळपास 6 लाख रुपये लूबाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

एडिट करून अश्लील फोटो व्हायरल... नंतर ब्लॅकमेल सुद्धा...
एडिट करून अश्लील फोटो व्हायरल... नंतर ब्लॅकमेल सुद्धा...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

व्हिडीओ कॉल करून तरुणीचे स्क्रॉनशिट काढले

point

नंतर, एडिट करून अश्लील फोटो व्हायरल...

Crime News: बिहारमध्ये एका तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून जवळपास 6 लाख रुपये लूबाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुजफ्फरपुर जिल्ह्यातील सकरा परिसरात राहणाऱ्या एक महिलेसोबत ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. 

अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

प्रकरणातील पीडितेला आधी आरोपीने तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिच्याकडून 6 लाख रुपयांची मागणी केली. पीडितेने इतके पैसे देऊन सुद्धा संबंधित आरोपीने तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. पीडितेने यासंबंधी सकरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून आरोपी तरुण हा मीनापुर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: घरात पंख्याला गळफास घेत महिलेचं टोकाचं पाऊल, पण लिव्ह-इन-पार्टनरने मृतदेहाला... मुंबईतील धक्कादायक घटना!

सहा महिन्यांपूर्वी त्या नंबरवरून कॉल

पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार करताना सांगितलं की सहा महिन्यांपूर्वी तिच्या फोनवर दोन वेगवेगळ्या नंबरवरून कॉल येत होता. त्यावेळी, तिने तो कॉल उचलला नाही. महिलेकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने आरोपीने तिला मॅसेज केला आणि म्हणाला की, "मला फक्त एकदा बोलायचं आहे." पीडितेने यासाठी नकार दिला असता आरोपीने आणखी दोन महिलांसोबत पीडितेचं बोलणं करून दिलं आणि त्या दोघी आपली आई आणि बहीण असल्याचं त्याने महिलेला सांगितलं. त्यावेळी, त्या महिला सुद्धा आरोपी तरुणाच्या कुटुंबातील असल्याचं पीडितेला सांगत होत्या. त्यानंतर, आरोपीने व्हिडीओ कॉलवर पीडितेशी बोलणं केलं. अशा प्रकारे त्याने बऱ्याचदा पीडितेला व्हिडीओ कॉल केले. 

हे ही वाचा: भाजप नेत्याचं घाणेरडं कृत्य, अल्पवयीन मुलीसोबतचा अश्लील VIDEO व्हायरल; प्रदेशाध्यक्ष चिडले अन्!

6 लाख रुपये लूबाडले 

व्हिडीओ कॉलवर पीडितेशी बोलत असताना आरोपीने त्याचे स्क्रीनशॉट काढले आणि ते एडिट करून त्याचे अश्लील फोटो बनवले. त्यानंतर, आरोपी तरुण पीडितेला सतत ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. आरोपीने पीडितेकडून आतापर्यंत 6 लाख रुपये लूबाडले असल्याचं महिलेनं सांगितलं. पण, तरीसुद्धा त्याने त्याचं हे कृत्य सुरूच ठेवलं. त्याने सोशल मीडियावर महिलेचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केला आणि त्यावर ती कॉल गर्ल असल्याचं सांगितलं. इतकेच नव्हे तर, आरोपीने तिचा फोन नंबर सुद्धा सार्वजनिक केला. पीडितेचे पती गुडगांवमध्ये कार्यरत असून ती दिल्लीमध्ये आपल्या बहिणीच्या घरी राहत असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं.  

हे वाचलं का?

    follow whatsapp