वाढदिवशी घडली थरारक घटना! केवळ 50 रुपयांवरून वाद पेटला अन् थेट मित्राच्या पोटात चाकूने... नेमकं काय घडलं?
बुधवारी (17 सप्टेंबर) एका 23 वर्षीय तरुणाने आपल्या मित्राच्या पोटात चाकूने हल्ला करून त्याची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

केवळ 50 रुपयांवरून वाद पेटला अन् थेट मित्रावर...

वाढदिवशी घडली थरारक घटना
Crime News: गुजरातच्या सूरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील पांडेसर परिसरात बुधवारी (17 सप्टेंबर) एका 23 वर्षीय तरुणाने आपल्या मित्राच्या पोटात चाकूने हल्ला करून त्याची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ 50 रुपये परत करण्याच्या कारणामुळे हे हत्याकांड घडलं.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बिट्टू सिंह अवधिया नावाच्या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या मित्रांनी चांगला प्लॅन बनवला होता. त्या दिवशी ते सगळे तिरुपति सर्कल जवळ एका हॉटेलमध्ये जमा झाले. याआधी ते सर्व मित्र Althan येथे गेले होते आणि तिथे सर्वांनी वाढदिवसाच्या खर्चासाठी काही रक्कम गोळा केली होती.
50 रुपये परत मागितले अन्...
सर्व जण हॉटेलमध्ये गेल्यानंतर, अनिल राजभर नावाच्या मित्राने बिट्टूकडे 50 रुपये परत मागितले आणि पार्टीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. याच गोष्टीवरून दोघांमध्ये वाद वाढत गेला. रागाच्या भरात बिट्टूने चाकू बाहेर काढला. त्यावेळी त्याने त्याचे मित्र अनिल आणि भगत सिंहवर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर, भगत सिंहला रुग्णालयात नेतानाच मृत घोषित करण्यात आलं तसेच, अनिलवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा: "तब्बल 'इतकी' मते वगळण्याचा प्रयत्न..." राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला केलं टार्गेट, पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
पांडेसरा पोलिसांनी प्रकरणासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि काही मिनिटांतच बिट्टू आणि त्याचा एक मित्र चंदनला अटक करण्यात आली.