Sangli Lok Sabha : "तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहिल", कदमांचं तुफान भाषण

भागवत हिरेकर

Vishwajeet Kadam Sangli Lok Sabha election : विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर विश्वजित कदम यांनी पहिल्याच भाषणात अनेक गौप्यस्फोट केले.

ADVERTISEMENT

विश्वजित कदम आणि विशाल पाटील.
विशाल पाटलांच्या बंडखोरीनंतर विश्वजित कदम काय बोलले?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विश्वजित कदमांचं सांगलीत भाषण

point

शिवसेनेसह मित्रपक्षातील नेत्यांवर टीकास्त्र

point

विशाल पाटलांच्या बंडानंतर विश्वजित कदमांचं पहिलं भाषण

Sangli Lok Sabha election : (प्रबोधिनी चिखलीकर, सांगली) विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर गुरुवारी (25 एप्रिल) काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा सांगलीत पार पडला. या मेळाव्यात विश्वजित कदमांनी काँग्रेसच्या नेत्यांसमोर खदखद व्यक्त केली. शिवसेनेने एकतर्फी उमेदवारी घोषित केल्याबद्दलची नाराजीही त्यांनी बोलून दाखवली. 

विश्वजित कदमांचं भाषण

"कार्यकर्त्यांच्या काही भावना होत्या. कुणी सांगितलं तुम्ही लोकसभा लढा. कुणी सांगितलं तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य द्या आम्ही ताकदीने काम करू. जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील आणि देशातील काही नेत्यांनीही सांगितलं की, विश्वजित तुला लोकसभा लढावी लागेल."

हेही वाचा >> ...म्हणून महाराष्ट्र काँग्रेसने विशाल पाटलांवर केली नाही कारवाई 

"२०१९ मध्येही सांगितलं. २०२४ मध्येही सांगितलं. मी नम्रपणे सांगितलं. २०१९ ची माझी अडचण वेगळी होती. ज्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाने १९८० च्या दशकात स्व. पतंगराव कदमांकडे काही नसताना साथ दिली, अशा माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडायचं नव्हतं. म्हणून मी निर्णय कळवला की, मला विधानसभाच लढायची आहे." 

कुणी आम्हाला विचारणार आहे का?

"२०१९ ची निवडणूक झाली. महाविकास आघाडीचं सरकार झालं. मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. मी नेहमी लोकांना सांगतो की, ती संधी पलूस कडेगावच्या लोकांना, सांगली जिल्ह्याला दिली होती. मी सांगलीत काम करत राहिलो. पाच वर्षात काय काय घडलं, हे कुणी आम्हाला विचारणार आहे का?", असा सवाल त्यांनी केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp