Sharad Pawar: 'आपली खूण तुतारी वाजवणारा माणूस..', पवारांनी कोणाला केलं सावध?
Sharad Pawar on trumpet: There is a lot of politics going on over the symbol Trumpet. Therefore, in a public meeting in Ahmednagar, Sharad Pawar has alerted the activists and voters by mentioning his symbol.
ADVERTISEMENT

Lok Sabha Election 2024: अहमदनगर: लोकसभा निवडणूक 2024 ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी (शरद पवार) अत्यंत निर्णयाक अशी आहे. त्यातही बारामतीची निवडणूक ही त्यांच्यासाठी खूपच प्रतिष्ठेची आहे. पण मागील दोन दिवसापासून 'तुतारी' या चिन्हावरून बरंच राजकारण सुरू आहे. शरद पवारांच्या पक्षाला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह मिळालं आहे. पण बारामतीत एका अपक्ष उमेदवाराला 'ट्रम्पेट' हे चिन्ह देण्यात आलं असून त्याचा प्रचार तुतारी म्हणून केला जात आहे. त्यामुळे बारामतीच्या नागरिकांमध्ये बराच संभ्रम पसरला आहे. पण हाच संभ्रम आता स्वत: शरद पवारांनी दूर केला आहे. (lok sabha election 2024 man who blowing tutari is our election symbol who did sharad pawar warn)
शरद पवार यांची आज (25 एप्रिल) निलेश लंकेच्या प्रचारासाठी अहमदनगरमध्ये जाहीर सभा घेतली. त्याच सभेत पवारांनी आपली खूण 'तुतारी फुकणारा माणूस' ही आहे. असं निष्ठून सांगितलं.. पुढे पवार असंही म्हणाले की, 'हे लोकं घोटाळे करण्यात फार हुशार आहेत..'
'आपली खूण तुतारी फुकणारा माणूस..', पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले...
'निलेश लंके यांना मोठ्या मताने विजयी करा.. त्यांची खूण तुतारी वाजवणारा माणूस ही आहे.. पण त्याच्यातही या लोकांनी घोटाळा केलाय लक्षात ठेवा.. हे लोकं घोटाळे करण्यात फार हुशार आहेत. त्यांनी आणखी एक माणूस बीडचा उभा केलाय.. त्याला फक्त तुतारी चिन्ह दिलं. फक्त तुतारी.. माणूस नाही..'
'आपली खूण काय तुतारी वाजवणारा माणूस.. माणूसही पाहिजे, तुतारीही पाहिजे.. यांनी काय निशाणी दिली फक्त तुतारी.. फक्त तुतारीचा आवाज दिल्लीला पोहचणार नाही.. दिल्लीला आवाज पोहचायचा असेल तर ती तुतारी फुंकली पाहिजे.. त्यासाठी माणूस पाहिजे. म्हणून तुतारी वाजवणारा माणूस ही खूण निलेश लंकेंची आहे.. त्याला मोठ्या मताने विजयी करा..' असं शरद पवार यावेळी म्हणाले.
'तुतारी' चिन्हाचा नेमका वाद काय?
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला तुतारी निवडणूक चिन्ह दिल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे त्यांचा आक्षेप नोंदवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव घड्याळ हे चिन्हच देऊ केलं. तर शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार हे नाव आणि महाराष्ट्राचे पारंपारिक वाद्य म्हणजे 'तुतारी वाजवणारा माणूस' हे निवडणूक चिन्ह दिलं.