Sangli Lok Sabha : "अरे भावा, नको या भानगडीत पडू", कदमांनी 'त्या' रात्री काय दिला मेसेज?

ADVERTISEMENT

विशाल पाटील आणि विश्वजित कदम.
विशाल पाटील यांच्या बंडानंतर विश्वजित कदम यांनी पहिल्यांदाच भाषण केले.
social share
google news

Sangli Lok Sabha election 2024 : सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी आज काँग्रेसच्या मेळाव्यातही दिसून आली. विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यांच्या या बंडखोरीबद्दलचा किस्सा आजच्या मेळाव्यात विश्वजित कदम यांनी सांगितलं. (Vishwajeet kadam says i had try to convince to vishal patil for withdrawal nomination)

सांगलीत झालेल्या काँग्रेस मेळाव्यात विश्वजित कदमांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

1) "जेव्हा ही जागा शिवसेनेने जाहीर केली... ठिक आहे. एक महिना... तुम्ही आमच्यासाठी लढलात... दिल्लीपर्यंत गेलात. लढलात तुम्ही पण काय झालं मला माहिती नाही. मला एवढंच सांगायचं आहे की, आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली, त्यावेळी सुद्धा मला राज्यातील, देशातील काही नेत्यांनी आशा दिली की, विश्वजित आपण प्रयत्न करू. प्रामाणिक प्रयत्न होता." 

2) "मला माहितीये रात्री बारा-एक वाजता नाना पटोले, बाळासाहेब थोरात साहेब म्हटले... थकलेले होते. आम्ही एक ते दोन जागं ठेवलं. आमचं म्हणणं मांडलं. दिल्लीमध्ये आम्ही रात्री भेटलो नेत्यांना. प्रत्येक ठिकाणी मी माझ्या तरुण सहकाऱ्याला सोबत घेऊन गेलो. पारदर्शकपणे मी तिकिटासाठी काम केलं. हे कुणी नाकारू शकत नाही." 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

3) "काय झालं मला कळत नाही की, शेवटी आम्हाला सांगण्यात आलं की, उमेदवारी कठीण आहे. अडचणीत आहे. एकतर्फी उमेदवारी जाहीर झाली. मी ठाम भूमिका घेतली की, एकतर्फी कशी? काँग्रेस पक्षाची जागा... काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने एकत्रित उमेदवारी जाहीर करावी, मग आम्ही आदेश मानू, मग आम्ही निर्णय मानू. इंडिया आघाडी लोकहितासाठी होतेय, हे सगळं मान्य आहे."

हेही वाचा >> माढ्यात पवारांची ताकद वाढली, आणखी एक धनगर नेता राष्ट्रवादीत

4) "आमच्यात अस्वस्थता झाली की, काय करायचं? मला एकच सांगायचं आहे आणि खरं सांगायचं आहे. आम्ही ही जागा मिळावी म्हणून पोटतिकडीने प्रयत्न केले. कुणी मला टोमणे मारले मागच्या दीड महिन्यात. कशाला करतोय विश्वजित, तुलाच त्रास होईल. तुझ्या घरातील उमेदवारी आहे का? अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या. पण मी सांगितलं की मी पंजासाठी लढत आहे." 

5) "मी काय चूक केलीय का? सगळ्यांना अंगावर घेतलंय ना मी? कुणा कुणाचा वाईटपणा घेतला. जिल्ह्यातील नेत्यांचा, राज्यातील नेत्यांचा... दीड महिने काय त्रास झाला, हे माझं मलाच माहिती आहे. पण, मी लढत राहिलो शेवटपर्यंत."

ADVERTISEMENT

6) "आज मला कार्यकर्ते विचारतात की, शेवटी काय झालं? लहानपणी आपण सापशिडीचा खेळ खेळायचो. या घटकेला दुर्दैवाने आम्हाला साप चावला. पण, एवढं नक्की सांगतो की, या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय आमचा राहिली, हे निश्चितपणे सांगतो."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहिल", कदमांचं तुफान भाषण 

7) "ज्यांनी ज्यांनी या सांगली जिल्ह्यामध्ये आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला. कशासाठी, कुणाच्या वाटेला आम्ही गेलो? कदम साहेबांनी आमच्यावर संस्कार घातले, काँग्रेसचे आमच्यावर संस्कार आहेत की, सरळ वाटेने राजकारण करायचं. सरळ वाटेनेच करत होतो." 

8) "तुम्ही सांगता की, विश्वजित, साहेब (पतंगराव कदम) खूप सरळ होते. सरळ होतेच म्हणून कदाचित मुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्यांना. राहू देत. होतेच सरळ. मी आमच्या लोकांना सांगतो आणि ज्यांनी कटकारस्थान केलं. त्यांना सांगू इच्छितो की, पतंगराव कदमांचे सगळे गुण माझ्यात आहेत. पण विश्वजित कदमांचेही स्वतःचेही काही गुण आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही. जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही." 

9) "तुमच्या सगळ्यांचे मला फोन येत होते. विश्वजित यातून मार्ग काढ. विशाल पाटील आपला तरुण सहकारी बंडखोर उमेदवारी करतोय. मी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलो होतो. १८ तारखेला माझ्याकडे आला. १७ तारखेला माझ्याकडे आला. २१, २२ ला रात्री आला. काँग्रेस शिवसेनेने माझ्या विनंतीला मान देऊन ही सगळी नेते मंडळी राहुल गाधींशी बोलले. मी स्वतः राहुलजींसोबत बोललो."

हेही वाचा >> नाशिकच्या जागेसाठी शिंदेंनी बनवला होता 'हा' प्लॅन; भुजबळांना दिली होती ऑफर 

10) "राज्यसभेच्या खासदारकीची आम्ही दोन पक्षांकडून... काँग्रेस आणि शिवसेनेकडून कबुली घेतली. मी सांगितलं की, अरे भावा, नको या भानगडीत पडू. अपक्ष लढणं वेगळं असतं. लोकसभेला लढणं वेगळं असतं. काही लोक आज तुझ्याकडे प्रेमापोटी येत असतील. काही लोक याच्यासाठी येत असतील. यात नको फसू. राज्यसभा काही वाईट नाही. आहे तसा खासदार फंड मिळेल. आहे तसा मानसन्मान मिळेल. तरुण वयात राज्यसभेत जाणं म्हणजे काही नाही. खासदार झालं. हरकत नाही. पुढची लोकसभा कुणी आडवा येऊ दे, तुमच्या विश्वासाने तुला खासदार म्हणून निवडून देईल हा विश्वास मी दिला. मी कुठलीही कसर सोडली नाही. कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही."

    follow whatsapp

    ADVERTISEMENT