Sunetra Pawar यांना क्लिनचीट मिळालेलं 25000 कोटींचा घोटाळा प्रकरण काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण आहे तरी काय?

point

क्लोजर रिपोर्टमध्ये काय?

Maharashtra State Cooperative Bank Scam : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offense Wing) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (MSCB) 25,000 कोटी रूपयांच्या प्रकरणात क्लिनचीट दिली आहे. अजित पवार, सुनेत्रा पवार आणि त्यांचा पुतण्या रोहित पवार यांच्याशी संबंधित या प्रकरणात कोणताही गुन्हा झाला नसल्याचे मुंबई पोलिसांनी आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (What exactly is the Maharashtra State Cooperative Bank Scam case in which sunetra Pawar got a clean chit)

ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण आहे तरी काय?

सातारा येथील 'जरंडेश्वर साखर सहकारी कारखाना' नावाच्या साखर कारखान्याच्या विक्रीत अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा सहभाग असल्याचा आरोप आर्थिक गुन्हे शाखेने केला होता. माहितीनुसार, ईडीच्या (अंमलबजावणी संचलनालय) तपासात असा दावा करण्यात आला होता की, हा कारखाना 2010 मध्ये गुरू कमोडिटी सर्व्हिसेसला 65 कोटी रूपांना विकला गेला होता. या कारखान्याने अनेक सहकारी बँकांकडून कर्ज घेतले होते, तरीही त्याची आर्थिक स्थिती बिकट झाली होती.

हेही वाचा : Sangli Lok Sabha : "तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहिल", कदमांचं तुफान भाषण

कारखान्याला कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचंही नाव होतं. जी 1995 मध्ये अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होती असा ईडीचा आरोप आहे. ज्यावेळी या कारखान्याला काहीच किंमत उरली नव्हती तेव्हा अजित पवार यांच्या नातेवाईकांना कवडीमोल भावाने कारखाना विकण्यात आला.

हे वाचलं का?

यावेळी जरंडेश्वर शुगर मिल्स (JSM) प्रायव्हेट लिमिटेड आणि जय अॅग्रोटेक यांनी कारखाना खरेदी करण्यासाठी खरेदीदाराला पैसे दिल्याचा आरोपही तपासात करण्यात आला. अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार 2008 पर्यंत जय अॅग्रोटेकच्या संचालक होत्या आणि त्यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे जरंडेश्वर साखर कारखान्याचे संचालक होते. त्यावेळी ईडीचे हे दावे होते. आता मुंबई पोलिसांनी सुनेत्रा पवरांचा जय अॅग्रोटेकशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. कारण, त्यांचा संचालक म्हणून कार्यकाळ 1 एप्रिल 2004 पासून सुरू झाला आणि 18 जुलै 2008 रोजी संपला. साखर कारखाना विक्रीवेळी त्यांचा या कंपनीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे आढळले. 

हेही वाचा : 'आपली खूण तुतारी वाजवणारा..', पवारांनी कोणाला केलं सावध?

त्याचप्रमाणे आर्थिक गुन्हे शाखेचा दावा आहे की, या प्रकरणात रोहित पवार यांची कोणतीही भूमिका सांगिता येणार नाही. काही महिन्यांपूर्वी ईडीने रोहित पवारांना अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. अनेक समन्सनंतर रोहित यावर्षी जानेवारीत ईडीसमोर हजर झाले. फेब्रुवारीमध्ये रोहित पवार म्हणाले होते की, 'ईडी पुन्हा-पुन्हा तेच प्रश्न विचारत आहे. आता मला तुरूंगात टाकल्यावरच चौकशी थांबेल.'

ADVERTISEMENT

आर्थिक गुन्हे शाखेच्या अहवालातून महत्त्वाची माहिती...

ADVERTISEMENT

ईडीच्या अहवालात, 'जरंडेश्वर साखर कारखाना, गुरू कमोडिटी आणि या व्यवहाराशी संबंधित चार्टर्ड अकाउंटंटला या प्रकरणात आरोपी ठरवण्यात आलं आहे.' तसंच, आर्थिक गुन्हे शाखेच्या अहवालानुसार, कारखान्याची विक्री अशा-तशा भावात झाली नसून रिझर्व्ह प्राइझच्या 19 कोटी रूपयांहून अधिक किंमतीत झाली. 

अहवालात म्हटले आहे की, 'विक्री व्यवहारापूर्वी दोन वर्ष, अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे हे जरंडेश्वर साखर कारखान्याचे संचालक होते आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या जय अॅग्रोटेकच्या संचालक होत्या. मात्र, 2010 मध्ये साखर कारखान्याची विक्री मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि सरफेसी कायद्यानुसार करण्यात आली. या व्यवहारात बँकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असंही आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे. दिलेल्या कर्जातून बँकेने आतापर्यंत 1,345.41 कोटी रूपये वसूल केले आहेत.'

हेही वाचा : नाशिकच्या जागेसाठी शिंदेंनी बनवला होता 'हा' प्लॅन; भुजबळांना दिली होती ऑफर

2020 पासून या प्रकरणात सातत्याने चढ-उतार होत आहेत. 2020 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात कोणताही गुन्हा झाला नसल्याचे सांगितले होते. ऑक्टोबर 2022 मध्ये भाजप-शिवसेना सत्तेवर आल्यानंतर, एजन्सीने सांगितले की, ते आपला क्लोजर रिपोर्ट बाजूला ठेवून तपास सुरू ठेवू इच्छिते. जानेवारी 2024 मध्ये पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर काही महिन्यांनी आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले की, कोणताही गुन्हा झाला नाही.

क्लोजर रिपोर्टमध्ये काय?

  • जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या लिलावासाठी एकूण 13 निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्या 2010 मध्ये ओमकार बिल्डरच्या अंधेरीस्थित गुरू कमोडिटीज सर्व्हिसेस या कंपनीला 65.8 कोटी रुपयांना विकल्या.

  • गुरू कमोडिटीजने ताबडतोब संबंधित साखर कारखाना नव्याने स्थापन केलेल्या जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर दिला.

  • कंपनी स्थापनेनंतर अवघ्या दोन आठवडयातच 19 नोव्हेंबर 2010 रोजी अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे हे संचालक असलेल्या जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जय अॅग्रोटेककडून 20.3 कोटी रुपये मिळाले होते, मात्र हा व्यवहार होण्याच्या दोन वर्षे आधीच सुनेत्रा पवार यांनी जय अॅग्रोटेकच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता.


          

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT