Lok Sabha ELection 2024 : पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाची नोटीस

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pm narendra modi congress rahul gandhi election commission issued notice congress and bjp party rally statement lok sabha election 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
social share
google news

PM Narendra Modi, Rahul gandhi, Election commission issued notice  : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सूरू आहे. अनेक बड्या नेत्यांकडून प्रचारांचा धडाका सूरू आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या प्रचार सभेत केलेल्या विधानांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाने (Election commission)  ही नोटीस बजावली आहे. या नोटीसीवर त्यांना आता येत्या 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. (pm narendra modi congress rahul gandhi election commission issued notice congress and bjp party rally statement lok sabha election 2024) 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून कथित आचारसंहितेचा उल्लंघन झाल्याप्रकरणाची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर धर्म, जात, समुदाय आणि भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप केला होता. या आरोपांची आता निवडणूक आयोगाने दखल घेऊन दोन्ही पक्षांना नोटीस पाठवली आहे. 

हे ही वाचा : नाशिकच्या जागेसाठी शिंदेंनी बनवला होता 'हा' प्लॅन; भुजबळांना दिली होती ऑफर

या नोटीसीतून लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77 अंतर्गत दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाने जाब विचारला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर तर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. तसेच यात निवडणूक आयोगाचे असेही म्हणणे होते की, राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या, विशेषतः स्टार प्रचारकांच्या वर्तनाची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल. तसेच उच्च पदांवर असलेल्या नेत्यांच्या भाषणांचे आणखी गंभीर परिणाम होऊ शकतात, असे देखील म्हटले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान निवडणूक आयोगाने काँग्रेसला पाठवलेल्या नोटीसवर जयराम रमेश म्हणाले की, आम्ही आयोगाकडे तक्रार केली होती. भाजप ज्या प्रकारे धर्माचा वापर करत आहे किंवा त्याचा दुरुपयोग करत आहे. हे खूपच चिंताजनक आहे. आम्ही या नोटीसला उत्तर देऊ, असे रमेश यांनी सांगितले. 

निवडणूक आयोगाने का पाठवली नोटीस ? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 एप्रिलला बांसवाडा येथे प्रचारसभा घेतली होती. या सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रसचं सरकार सत्तेवर आल्यास ते देशाची संपत्ती घुसखोर आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांच्यामध्ये वाटू शकतात. पंतप्रधान मोदींच्या याच विधानावर काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेत कारवाईची मागणी केली होती. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा :"शपथेला नाही, खंजिराला महत्त्व", शरद पवारांचा बावनकुळेंनी काढला इतिहास

राहुल गांधी यांनी तमिळनाडूत भाषेच्या आधारावर लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपने केला होता. राहुल गांधी आपल्या भाषणात भाषेच्या आधारावर उत्तर आणि दक्षिण भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, असा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता.तसेच राहुल गांधी यांच्यावर कारवाईची मागणी देखील करण्यात आली होती. दरम्यान आता या दोन्ही नेत्यांच्या पक्षांना 29 एप्रिलच्या सकाळी 11 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर द्यावे लागणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT