कबड्डीपटूशी लग्न ते कॅन्सरने निधन… इमोशनल आहे ACP प्रद्युम्न यांची Love Story

मुंबई तक

20 Apr 2023 (अपडेटेड: 20 Apr 2023, 02:35 PM)

कुछ तो गड़बड़ है दया…! हे वाक्य ऐकल्यावर 90’s पिढीपुढे एकच चेहरा येतो तो ACP प्रद्युम्न यांचा. ACP प्रद्युम्न, अभिजीत आणि दया या पात्रांनी CID च्या माध्यमातून 2 पिढ्यांचं मनोरंजन केलं. ACP प्रद्युम्न अर्थात शिवाजी साटम यांनी तर आपल्या आयुष्यातील 21 वर्षे CID या शोसाठी दिली.

Shivaji Satam And Aruna Satam love story

Shivaji Satam And Aruna Satam love story

follow google news

कुछ तो गड़बड़ है दया…! हे वाक्य ऐकल्यावर 90’s पिढीपुढे एकच चेहरा येतो तो ACP प्रद्युम्न यांचा. ACP प्रद्युम्न, अभिजीत आणि दया या पात्रांनी CID च्या माध्यमातून 2 पिढ्यांचं मनोरंजन केलं. ACP प्रद्युम्न अर्थात शिवाजी साटम यांनी तर आपल्या आयुष्यातील 21 वर्षे या शोसाठी दिली. एक कडक स्वभावाचा अधिकारी म्हणून त्यांनी या मालिकेच्या माध्यमातून ओळख मिळवली होती. एसीपी प्रद्युम्न शिवाय त्यांनी इतरही अनेक भूमिका केल्या, पण हीच भूमिका त्यांच्या आयुष्याची ओळख बनली होती. (ACP Pradyumna, Abhijeet and Daya entertained 2 generations through CID)

हे वाचलं का?

पण टीव्हीवर कडक स्वभावाचा वाटणारे CID ऑफिसर खऱ्या आयुष्यात खूप मृदुभाषी होते, हे अनेकांना सांगून पटणार नाही. पण हे खरं आहे. शिवाजी साटम यांचं आयुष्य, त्यांची प्रेमकहाणी या सगळ्या गोष्टी सर्वांनाच प्रेरणा देणाऱ्या आहेत. शिवाजी साटम आज त्यांचा ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बॉलिवूडवर शोककळा! यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे निधन

पत्नी कबड्डी चॅम्पियन होती :

शिवाजी साटम यांच्या पत्नी अरुणा साटम यांचे निधन होऊन 23 वर्षे झाली, पण आजही त्यांना त्यांची खूप आठवण येते. या दोघांची प्रेमकहाणी खूप वेगळी होती. त्यांची जोडी पाहून अनेकांना वाटायचं की दोघांनी लव्ह मॅरेज केले असावे. पण तसं नव्हतं, त्यांनी अरेंज मॅरेज केलं होतं आणि हे लग्न त्यांच्या वडिलांनी ठरवलं होतं. 70 च्या दशकाच्या तुलनेत विचार केला तर शिवाजी साटम यांच्या पत्नी अत्यंत पुढारलेली विचारसरणीच्या होत्या.

हे लग्न कसं जुळलं हे खुद्द शिवाजी साटम यांनीच सांगितलं आहे. ते म्हणाले – माझे वडील कुस्तीपटू होते, ते कुटुंबाचे प्रमुख होते. ते रोज आखाड्यात जायचे. माझा मोठा चुलत भाऊ एक पुरस्कार विजेता खेळाडू होता. माझे वडील पुरोगामी विचार करणारे होते. ते स्वतः माझ्या बहिणीला आखाड्यात घेऊन जायचे. त्यांच्याकडे जुनी आणि रूढीवादी विचारसरणी कधीच नव्हती.

शिवाजी साटम पुढे म्हणाले, अशात एक दिवस वडिलांच्या एका मित्राच्या माध्यमातून आमच्या दोघांचे नाते जुळले. ती मला आवडली, तिला मी आवडलो आणि आम्ही दोघांनी एकत्र पुढे जाण्यचा निर्णय घेतला. ती महाराष्ट्राच्या कबड्डी संघाची कर्णधार होती. तिला छत्रपती शिवाजी पुरस्कारही मिळाला होता. ती टीमची मॅनेजर होती, नंतर प्रशिक्षकही झाली. ती तिच्या आयुष्यात सर्वकाही करत होती. आम्ही फार काळ नाही पण 24 वर्षे तरी एकत्र होतो. पुढे अरुणाचे कर्करोगाने निधन झाले.

नाना पाटेकर-अरुणा इराणी यांनी दिला आधार :

शिवाजी साटम यांनी सांगितले की, पत्नीचे उपचार 7 वर्षे चालले.  त्यावेळी उपचारादरम्यान कुटुंबासह चित्रपट जगतातील अनेकांनी साथ दिली. काळ खूप कठीण असतो, पण मला वाटतं अशाच वेळी अचानक तुमच्यात लढायची हिंमत येते. पूर्वी एकत्र कुटुंब असायचे, पण त्यावेळी माझी बहीण, भाऊ आणि त्याचे कुटुंब, आई आम्ही सगळे शेजारी-शेजारीच फ्लॅटमध्ये राहायचो. गरज पडली की आवाज द्यायचो.

Arshad Warsi: ‘मुन्नाभाई’तील सर्किटच्या खऱ्या आयुष्याची कहाणी वाचून तुमचाही फ्यूज उडेल!

तो वेळ कसा गेला कळलेही नाही. मुलं मोठी होत होती. पण त्यांना फक्त मोठे करायचे नव्हते, त्यांचे पालनपोषणही करायचे होते, कुटुंबाने त्यांना साथ दिली. मी आणि माझी पत्नी, चित्रपट, थिएटरमध्ये व्यस्त होतो. माझ्या पत्नीसोबत हे सर्व घडले तेव्हा मी ‘गुलाम-ए-मुस्तफा’चे शूटिंग करत होतो. या चित्रपटात नाना पाटेकर, अरुणा इराणी एकत्र होते. हे लोक माझे कुटुंब नव्हते, पण त्यापेक्षाही कमी नव्हते. या तीन महिन्यांत या लोकांनी माझी खूप काळजी घेतली, हे सांगताना शिवाजी साटम भावूक झाले होते.

अभिनय कारकिर्दीत शिवाजी साटम यांनी ‘नायक’, ‘वास्तव’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘चायना गेट’, ‘यशवंत’, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘हू. तू ‘तू’ आणि ‘सूर्यवंशम’ सारख्या चित्रपटात दिसले आहेत. यानंतर 1998 साली शिवाजी साटम यांनी CID मध्ये गेले आणि आणि सलग २१ वर्ष आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. अभिनयासोबतच शिवाजी साटम चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मितीही करतात.

    follow whatsapp