पहलगाम हल्ल्यात डोळ्या देखत पती घेतला हिरावून, Operation Sindoor नंतर हिमांशी नरवाल काय म्हणाली?

operation Sindoor : पहलगाम हल्ल्यात मांडीवर मृतदेह ठेवणाऱ्या हिमांशी नरवाल यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यात त्यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी पुन्हा पहलगाममधील झालेल्या हल्ल्याचा वाईट अनुभव सांगितला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर हिमांशी नरवालची प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूरनंतर हिमांशी नरवालची प्रतिक्रिया

मुंबई तक

07 May 2025 (अपडेटेड: 07 May 2025, 09:40 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जम्मू-काश्मीरातील पहलगाम हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता.

point

ज्यात विनय नरवाल या लेफ्टिनंट अधिकाऱ्याला जीवं मारलं होत.

point

विनय नरवालच्या पत्नी हिमांशी नरवालनं सिंदूर हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय.

operation Sindoor : जम्मू-काश्मीरातील पहलगाम हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. ज्यात विनय नरवाल या लेफ्टिनंट अधिकाऱ्याला धर्म विचारून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर पत्नी हिमांशी नरवाल यांनी आपल्या पतीचा मृतदेह मांडीवरती ठेवला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर आजही व्हायरल होत आहेत. त्यानंतर आता मोदी सरकारने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 ठिकाणी हल्ला केला होता. याचपार्श्वभूमीवर हिमांशीनं या हल्ल्यानंतर आज 7 मे 2025 रोजी  प्रतिक्रिया दिलीय. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'मी पण मेलो असतो तर बरं झालं असतं...', कुटुंबातील 10 जण ठार झाल्यावर दहशतवादी मसूद अझहरला 'हे' सुचलं

22 एप्रिल रोजी मन सुन्न करून टाकणारी घटना घडली होती त्यावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी या घडलेल्या घटनेचा वाईट अनुभव सांगितलाय. त्या म्हणाल्या, मी दहशतवाद्यांना माफी मागितली होती. आमच्या लग्नाला केवळ  6 दिवस झाले होते. आम्ही तिथं असताना दहशतवादी म्हणाले होते की, जा तुमच्या नरेंद्र मोदींना सांगा. त्यानंतर आज 7 मे 2025 रोजी आपल्या लष्करी सैन्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानात घुसत त्यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. 

त्या पुढे म्हणाल्या, मला आनंद आहे की, दहशतवाद्यांचा बदला घेण्यात आलाय. दु:ख याचं आहे की, 26 भारतीय नागरिक आज आपल्यात नाहीयेत. यानंतर त्यांनी 22 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेची सल भावनेतून व्यक्त केलीय.  

हिमांशी नरवाल यांनी 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा संदर्भ देण्यात आला. ज्यात दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या काही दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. नरेंद्र मोदींनी ती मागणी आज पूर्ण केलीये.  त्या पुढे म्हणाल्या की, दहशतवाद्यांनी वाईट वागणूक दिली होती. अनेकदा अपशब्द वापरले होते. हे सर्व आठवल्यानंतर त्यांनी हळहळ व्यक्त केलीय. 

हेही वाचा : जगाला 'ऑपरेशन सिंदूर' कसं घडलं हे सांगणारी कर्नल सोफिया कुरैशी आहे तरी कोण?

पाकिस्तानावरील हल्ल्यानंतर हिमांशी यांचा उर अभिमानानं भरून आलाय. मी या देशातील एका धाडसी सैन्याची पत्नी आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर मी 2 तास पहलगाममध्ये हे युद्ध लढलं होतं. माझ्यासोबत काही महिलांचाही समावेश होता. मला विश्वास होता की, भारतीय सेना आणि मोदी सरकार चिघळलेल्या जखमेवर मलम लावेल. सैन्यानं आणि सेनेनं या कारवाईनंतर भारतानं आपली मान उंचावली आहे. 
 

    follow whatsapp