जगाला 'ऑपरेशन सिंदूर' कसं घडलं हे सांगणारी कर्नल सोफिया कुरैशी आहे तरी कोण?
Operation Sindoor : भारतीय सैन्यदलात शूर महिला अधिकाऱ्यांमध्ये सोफिया कुरैशी यांचं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी नोंदवण्यात येईल. आंतरराष्ट्रीय पुरूष लष्करी तुकड्यांचं नेतृत्व करत इतिहास घडवू पाहणाऱ्या त्या भारतीय लष्करातील पहिल्या महिला अधिकारी आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोण आहेत कर्नल सोफिया कुरैशी?

यशस्वी हल्ला झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूर नंतर भारताच्या सैन्यानं माध्यमांना एक महत्त्वाचा संदेश जारी केला.

ब्रीफिंगमध्ये परराष्ट्र सचिवांसोबत लष्करांच्या धाडसी महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता.
Operation Sindoor: नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी काही भारतीय निष्पाप पर्यटकांची दहशतवाद्यांनी क्रूरपणे हत्या केली होती. यानंतर अखेर आज (7 मे) भारतानं पाकिस्तानला जशासं तसं प्रत्युत्तर दिलं आहे. पहाटे 1.30 वाजता भारतीय सैन्यानं थेट पाकिस्तानमध्ये खोलवर हवाई हल्ला केला. या धाडसी हल्ल्यात पाकव्याप्त आणि पाकिस्तानातील एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य केलंय. यामध्ये 90 दहशवतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
या हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' असं कोड नेम देण्यात आलं होतं. याच ऑपरेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कराने आपली ताकद दाखवून दिली आहे. ज्यानंतर भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या ब्रीफिंगमध्ये परराष्ट्र सचिवांसोबत लष्करांच्या धाडसी महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. अशातच भारतीय महिला शक्तीच या भ्याड कृत्यांना उत्तर देण्यासाठी परिपूर्ण आहेत हेच भारताने दाखवून दिलं आहे. या ब्रीफिंगमध्ये भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरैशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह या सहभागी झाल्या होत्या.
लष्करातील या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये नेमका हल्ला कसा झाला हे जगाला सांगितलं. ऑपरेशन सिंदूरची नेमकी कहाणी या दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितली. एवढंच नव्हे तर यासंबंधीचे काही व्हिडिओ देखील दाखविण्यात आले. दरम्यान, एवढी मोठी जबाबदारी सोपविण्यात आलेल्या कर्नल सोफिया कुरैशी कोण याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्याचविषयी जाणून घेऊया सविस्तरपणे.
हेही वाचा : 'पाकिस्तानमधून भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात...' ऑपरेशन सिंदूरनंतर Army च्या पत्रकार परिषदेत मोठं विधान
कोण आहेत कर्नल सोफिया कुरैशी?
भारतीय सैन्यदलात शूर महिला अधिकाऱ्यांमध्ये सोफिया कुरैशी यांचं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी नोंदवण्यात येईल. आंतरराष्ट्रीय पुरूष लष्करी तुकड्यांचं नेतृत्व करत इतिहास घडवू पाहणाऱ्या त्या भारतीय लष्करातील पहिल्या महिला अधिकारी आहेत.
हेही वाचा : 'पाकिस्तानमधून भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात...' ऑपरेशन सिंदूरनंतर Army च्या पत्रकार परिषदेत मोठं विधान
पत्रकार परिषदेत हिंदीमध्ये संपूर्ण माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरैशी यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांचा प्रत्येक तपशील जगासमोर मांडला. गुजरात राज्यातील वडोदरात कर्नल सोफिया यांचा 1981 साली जन्म झाला. सोफिया कुरैशी या कॉर्प्स ऑफ सिग्नल याच्याशी संलग्न अधिकारी आहेत. 35 वर्षीय सोफिया कुरैशी सध्या बहु-देशीय लष्करी सरावात भारतीय सैन्याच्या संपूर्ण तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी आहे.
2016 मध्ये, ती एक्सरसाइज फोर्स 18 मिलिटरी ड्रिलचा भाग बनली होती आणि तिचे नेतृत्वही केले होते. एवढेच नाही तर गुजरातमधील सोफिया कुरैशी ही एका लष्करी कुटुंबातून आली आहे आणि तिच्याकडे बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी देखील आहे. सुमारे 6 वर्षांपासून तिने संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत भारताच्या वतीने योगदानही दिले आहे.