प्रसिद्ध अभिनेत्याचा बंद कारमध्ये सापडला मृतदेह! पोलिसांनी सांगितली धक्कादायक माहिती

मुंबई तक

• 05:41 AM • 19 Nov 2023

मल्याळम चित्रपटसृष्टीबरोबरच भारतीय चित्रपट क्षेत्रात ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला वेगळा ठसा उमटविला होता ते अभिनेते विनोद थॉमस यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. मात्र अजून तरी त्यांच्या मृत्यूचे नेमकं कारण समजू शकलं नाही.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Vinod Thomas Died : चित्रपट जगतात आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटविणाऱ्या प्रसिद्ध मल्याळम चित्रपट (Malayalam Film) अभिनेत्याच्या निधनामुळे (Death) मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अभिनेता विनोद थॉमस यांचे वयाच्या 45 व्या वर्षी निधन झाल्यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. पंपाडीजवळील हॉटेलमध्ये उभ्या असलेल्या कारमध्येच विनोद थॉमस हे मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटकडून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत तपासाला सुरुवात केली आहे.

हे वाचलं का?

कारमध्येच झाला मृत्यू

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हॉटेल प्रबंधनच्या मॅनेजमेंटकडून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारमध्ये गेल्या काही तासांपासून एक व्यक्ती दिसून येत असल्याचे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन विनोद थॉमस यांना कारमधून बाहेर काढण्यात आले, व त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या आधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मृत्यूचं नेमकं कारण काय?

अभिनेता विनोद थॉमस यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, मात्र अजून त्यांच्या मृत्यूचे नेमकं कारण समजू शकलं नाही. डॉक्टरांबरोबरच पोलिसही त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधू लागले आहेत.

हे ही वाचा >>IND vs AUS Final : भारत-ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कपची फायनल लढत! खेळपट्टी आणि हवामान कसं आहे?

दमदार अभिनय

विनोद थॉमस हे मल्याळम चित्रपटातील एक दिग्गज कलाकार होते. त्यांनी ‘अय्यप्पनम कोस्युम’, ‘नाथोली ओरू चेरिया मीनाल्ला’, ‘ओरू मुराई वंथ पथया’, ‘हॅपी वेडिंग’ आणि ‘जून’ यासारख्या चित्रपटांतून त्यांनी काम केले होते. त्यांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटसृष्टीत त्यांची एक वेगळी ओळख होती.

विनोद थॉमसचा मृत्यू धक्कादायक

अभिनेता विनोद थॉमस यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. विनोद आता आपल्यामध्ये नाहीत यावर अजूनही कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. तसेच त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरुनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तर त्यांच्या निधनाची बातमी ही साऱ्यांसाठी धक्कादायक असल्याची भावना त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

    follow whatsapp