मुंबईची खबर : मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! मेट्रोच्या कामाला वेग, जुहू सर्कलवर मोठा टप्पा पूर्ण

पृथ्वीराज पाटील

25 Nov 2026 (अपडेटेड: 25 Nov 2026, 06:05 PM)

मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रोने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

Mumbai News

Mumbai News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील मेट्रोसंबंधी महत्त्वाची माहिती समोर

point

पूर्व-पश्चिम मेट्रो जोडणीच्या कामात महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण

Mumbai News : मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका 2 ब च्या कामाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू असलेल्या या प्रकल्पांतर्गत जुहू सर्कल येथे सर्व 12 गर्डर्स उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे डी. एन. नगर ते सारस्वत नगर या मेट्रो मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग मिळाला आहे. मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची बाब मानली जात आहे.

हे वाचलं का?

'या' मार्गावर सहा मेट्रो स्थानके

मेट्रो मार्गिका 2 ब च्या फेज 2 अंतर्गत डी. एन. नगर ते सारस्वत नगर असा 7.167 किलोमीटरचा मार्ग तयार केला जात आहे. या मार्गावर जुहू, प्रेम नगर, इंदिरा नगर, नानावटी हॉस्पिटल, खिरा नगर आणि सारस्वत नगर अशी सहा मेट्रो स्थानके असणार आहेत. डी. एन. नगर येथे मेट्रो मार्गिका 1 आणि  2 अ सोबत प्रवाशांना जोडणी मिळणार आहे. तसेच खिरा नगर मेट्रो स्थानकातून सांताक्रूझ रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचणेही सोपे होणार आहे.

हे ही वाचा : पुणे : सुनावणी संपवून बाहेर येताच गेम केला! मंदार किवळेवरील क्रूर हल्ल्यामागं नेमकं कारण काय?

'या' भागांना होणार फायदा

दरम्यान, मेट्रो मार्गिका 2 ब चा पहिला टप्पा मंडाले ते चेंबूरदरम्यान प्रवाशांच्या सेवेत सुरू झाला आहे. आता पश्चिम उपनगरातील दुसऱ्या टप्प्याचे कामही वेगाने सुरू आहे. संपूर्ण मेट्रो मार्गिका 2 ब ही 23.643 किलोमीटर लांबीची असून त्यावर एकूण 19 स्थानके असणार आहेत. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.

हे ही वाचा : Pune: मंदार किवळेवरील हल्ल्यानंतर रोहित पवारांचा भाजपला सवाल; 'नव्या पुण्याचे शिल्पकार काय बोलणार?'

रस्त्यावरील वाहतुकीचा ताण होणार कमी

संपूर्ण मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर अंधेरी पश्चिम ते बीकेसी आणि मंडालेदरम्यान थेट मेट्रो जोडणी उपलब्ध होईल. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. तसेच उत्तर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील विविध भागांमध्ये जाणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिका 2 ब पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.