कोल्हापुरात हिट अँड रनचा थरार! चुलत भावांचा जीव गेला; गोकुळच्या माजी अध्यक्षाच्या मुलाचा प्रताप

दिपक विष्णू सूर्यवंशी

24 Nov 2026 (अपडेटेड: 24 Nov 2026, 12:18 PM)

Kolhapur hit and run case : कोल्हापुरातील सायबर चौकाजवळ कार आणि दुचाकीच्या धडकेत उमेश पाथरूट आणि गणेश पाथरूट या दोन चुलत भावांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी पद्मसिंह पाटील यांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे.

Kolhapur hit and run case

Kolhapur hit and run case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कोल्हापुरात हिट अँड रनचा थरार! चुलत भावांचा जीव गेला

point

गोकुळच्या माजी अध्यक्षाच्या मुलाचा प्रताप

Kolhapur hit and run case : कोल्हापुरात हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार घडलाय. कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांचे पुत्र पद्मसिंह पाटील यांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी विद्यापीठ ते शाहू टोलनाका या मार्गावर सायबर चौकाजवळ रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात उमेश पाथरूट आणि गणेश पाथरूट या दोघांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याने पाथरूट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : जळगावच्या पठ्ठ्याने मैदान मारलं; अवघे 24 रुपये घेऊन आलेला पोरगा बनला 'केबीसी 18' चा पहिला करोडपती!

इलेक्ट्रिक कार बेदरकारपणे चालवली, दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मसिंह रणजित पाटील हे विनफास्ट कंपनीची इलेक्ट्रिक कार भरधाव वेगाने चालवत होते. यावेळी त्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे कार चालवली. सायबर चौकाजवळ त्यांच्या कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. या दुचाकीवर उमेश पाथरूट आणि गणेश पाथरूट हे दोघे प्रवास करत होते. धडक इतकी जोरदार होती की या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. दोघेही सख्खे चुलत भाऊ होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : Weather Update: ऐन थंडीत बसणार उन्हाचा चटका! कसं असंल राज्यातील आजचं हवामान?

कारचालक घटनास्थळावरून निघून गेल्याची चर्चा

अपघाताची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून निघून गेल्याची चर्चा होती. मात्र, राजारामपुरी पोलिसांनी पद्मसिंह पाटील यांना अटक केली आहे. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. या तपासणीचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील आरोपीला आज दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

या अपघातानंतर कोल्हापुरात मद्यपान करून वाहन चालवण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबतचा वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. भरधाव वेगाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा राजारामपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत. या अपघातात दोन तरुणांचा जीव गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा प्रसंग ओढवला आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी या अपघाताबाबत माहिती दिली.