पुणे : सुनावणी संपवून बाहेर येताच गेम केला! मंदार किवळेवरील क्रूर हल्ल्यामागं नेमकं कारण काय?

पुण्यात सत्र न्यायालयाबाहेर हल्ल्याची भयंकर घटना घडली. एका तरुणावर आधी गोळीबार आणि नंतर कोयत्याने सपासप वार करण्यात आले.

ADVERTISEMENT

Pune Crime
Pune Crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पुणे हादरले!

point

तरुणावर कोयत्याने सपासप वार

point

न्यायालयाबाहेर काय घडलं?

Pune Crime : पुण्यातील सत्र न्यायालयाबाहेर एक हादरवून टाकणारी घटना घडली. एका व्यक्तीवर बंदुकीने गोळीबार करुन नंतर त्याच्यावर धारदार कोयत्याने सपासप वार करण्यात आले. मंदार किवळे असं हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो कोर्टातून बाहेर आला आणि दोन गाड्यांवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. यानंतर मंदारला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील 72 तास महत्त्वाचे असल्याचं रुग्णालयाचे डीन येल्लाप्पा जाधव यांनी सांगितलं आहे.

भावाच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी हल्ला

मंदार किवळे हा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून सध्या जामिनावर बाहेर आहे. दोन वर्षांपूर्वी एका व्यक्तीची हत्या झाली होती. या हत्येच्या प्रकरणात मंदारचाही सहभाग असल्याची माहिती आहे. दरम्यान, हत्या झालेल्या व्यक्तीच्या भावाने भावाच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी मंदारवर हल्ला केल्याची चर्चा आहे. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हे ही वाचा : पुण्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! कोर्टाबाहेर गोळीबार, तरुणावर कोयत्याने सपासप वार

आधी गोळीबार, नंतर कोयत्याने वार

मिळालेल्या माहितीनुसार, मंदार किवळे याची बुधवारी (25 नोव्हेंबर) न्यायालयात सुनावणी होती. सुनावणी संपल्यानंतर तो न्यायालयाबाहेर आला. त्याचवेळी दोन वाहनांमधून आलेल्या सहा हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य केले. सुरुवातीला हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. मात्र, त्यातून तो बचावल्यानंतर आरोपींनी कोयत्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या डोक्यावर एकापाठोपाठ वार करण्यात आले. हा हल्ला अत्यंत भीषण होता.

हे ही वाचा : 'भांडणं थांबवा आणि...', सुप्रिया सुळेंची 'त्या' गोष्टीसाठी सरकारला हात जोडून विनंती!

पंजा तुटून लोंबकळू लागला

हल्ल्यात मंदारच्या हाताच्या पंजालाही गंभीर दुखापत झाली असून तो तुटून लोंबकळत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी दोन दुचाकी गाड्यांवर बसून घटनास्थळावरून फरार झाले. रक्तबंबाळ अवस्थेत मंदार काही अंतर चालत गेला आणि त्यानंतर रस्त्यावर कोसळला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा : सांगली हादरली, चारचाकीला कट मारल्याचा वाद गळा चिरेपर्यंत पोहोचला, हरिपूरच्या तरुणाची हत्या

ससून रुग्णालयाचे डीन काय म्हणाले?

ससून रुग्णालयाचे डीन येल्लाप्पा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदारच्या उजव्या आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच डोक्याच्या पाठीमागील बाजूला फ्रॅक्चर आहे. या हल्ल्यात त्याचा खूप रक्तस्त्राव झाला असल्याने पुढील 72 तास महत्त्वाचे आहेत. त्याच्या उजव्या हाताला आणि पाठीला गोळी चाटून गेली असल्याचं देखील जाधव यांनी सांगितलं.