नाना पाटेकरांची पत्नी कोण आहे? जिंकलेला नॅशनल अवॉर्ड; अनेक वर्षांपासून राहायचे वेगळे

मुंबई तक

08 Oct 2026 (अपडेटेड: 08 Oct 2026, 11:21 AM)

Nana Patekar wife neelakanti patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्याची पुन्हा चर्चा होत आहे. पत्नी नीलकंती पाटेकर कोण आहेत आणि दोघे अनेक वर्षे वेगळे का राहत होते, जाणून घ्या.

Nana Patekar wife neelakanti patekar

Nana Patekar wife neelakanti patekar

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नाना पाटेकरांची पत्नी कोण आहे?

point

जिंकलेला नॅशनल अवॉर्ड; अनेक वर्षांपूर्वी राहायचे वेगळे

Nana Patekar wife neelakanti patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकाली निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पडद्यावर आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे नाना पाटेकर आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मात्र कायमच कमी बोलत असत. अभिनेत्रीशी विवाह झालेला असूनही त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याची फारशी चर्चा केली नाही. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांविषयी आणि वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे त्यांची पत्नी नीलकंती पाटेकर कोण आहेत आणि नाना पाटेकर यांच्यासोबत त्यांचे वैवाहिक नाते कसे होते, हे जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हेही वाचा : क्षणात जीव घेणारा आजार! नाना पाटेकर यांच्या निधनानंतर कार्डियक अरेस्ट चर्चेत, हृदयविकारापेक्षा नेमकं काय वेगळं?

नानांच्या पत्नींनी जिंकलेला राष्ट्रीय पुरस्कार

1978 मध्ये नाना पाटेकर आणि नीलकंती पाटेकर यांचा विवाह झाला. नीलकंती स्वतःही चित्रपटसृष्टीशी संबंधित होत्या. लग्नानंतर नाना आणि नीलकंती दोन मुलांचे पालक झाले. मात्र, दोन वर्षाचा असताना त्यातील एका मुलाचं निधन झालं होतं. नीलकंती यांनी 1966 मध्ये बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. अभिनेत्री होण्यापूर्वी त्या बँक अधिकारी म्हणून काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी मराठी अभिनेत्री आणि लेखिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 1989 मध्ये ‘आत्मविश्वास’ या मराठी चित्रपटातील कामासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

हेही वाचा : 'माझ्या आयुष्यातील अत्यंत वाईट गोष्ट...जीवलग मित्र..' पाटेकरांच्या आठवणीत अशोक सराफ भावूक

35 वर्षांपासून पत्नीपासून वेगळे 

उत्तम काम केल्यानंतर नीलकंती काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्या. त्यानंतर त्यांनी विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले. दरम्यान, नाना पाटेकर आणि नीलकंती पाटेकर यांनी आपले वैयक्तिक आयुष्य बहुतांश वेळा प्रसिद्धीपासून दूर ठेवले. दोघे अनेक वर्षांपासून वेगवेगळे राहत होते. नाना पाटेकर सुमारे 35 वर्षांपासून पत्नीपासून वेगळे राहत होते. मात्र, दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतलेला नव्हता. त्यामुळे वेगळे राहत असतानाही दोघे पती-पत्नी होते.

नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत आपल्या आणि नीलकंती यांच्या नात्याबाबत भाष्य केले होते. दोघांच्या स्वभावात आणि विचारांमध्ये फरक असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच नीलकंती यांनी त्यांच्या आयुष्यात आणि कारकिर्दीत दिलेले योगदानही त्यांनी मान्य केले होते. पत्नीपासून वेगळे राहण्याचा अर्थ लग्न संपले असा होत नाही, असेही त्यांनी म्हटले होते. नाना पाटेकर आणि नीलकंती वेगळे का झाले, याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, वेगळे राहत असतानाही त्यांचे वैवाहिक नाते कायदेशीररित्या कायम होते.