Ram Mandir : राम मंदिरासाठी तुम्हीही दिली असेल देणगी तर करात मिळेल सूट! नेमकी प्रक्रिया काय?

रोहिणी ठोंबरे

• 12:55 PM • 25 Jan 2024

प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला असून सर्वत्र रामाचा जयघोष होत आहे. बजेटही लवकरच येणार आहे. जर तुम्हालाही रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी द्यायची असेल, तर तुम्ही यावर कर सवलतीचा लाभही घेऊ शकता.

If you have donated for Ram Mandir you will get tax exemption by donating money What exactly is the process

If you have donated for Ram Mandir you will get tax exemption by donating money What exactly is the process

follow google news

Ram Mandir Donation Process : ज्या दिवसाची लोक आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो दिवस आला. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला असून सर्वत्र रामाचा जयघोष होत आहे. बजेटही लवकरच येणार आहे. जर तुम्हालाही रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी द्यायची असेल, तर तुम्ही यावर कर सवलतीचा लाभही घेऊ शकता. (If you have donated for Ram Mandir you will get tax exemption What exactly is the process)

हे वाचलं का?

करात कशी मिळणार सूट?

सरकारच्या आयकर कायदा 1961 च्या कलम 80G अंतर्गत राम मंदिराच्या जीर्णोद्धार किंवा दुरुस्तीसाठी दान केलेल्या रकमेच्या 50% रकमेवर आयकर सूट घेऊ शकता. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वेबसाइटनुसार, केंद्र सरकारने 2020-2021 या आर्थिक वर्षापासून “श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र” (PAN: AAZTS6197B) हे ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण म्हणून अधिसूचित केले आहे.

वाचा : Maratha Reservation : जरांगेंची मुख्यमंत्र्यांना चर्चेची विनंती, CM शिंदे म्हणाले, ‘माझे अधिकारी…’

श्री रामजन्मभूमी तीर्थ परिसरातील मंदिराच्या पुनर्बांधणी/दुरुस्तीसाठी जी काही देणगी दिली जाईल. त्यातील 50 टक्के आयकर कायदा, 1961 च्या कलम 80G अंतर्गत अटींच्या अधीन राहून कलम 80G (2) (b) अंतर्गत डिडक्शनसाठी पात्र असतील. 2000 रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेवर कर कपात करण्याची परवानगी नाही.

ट्रस्टला देणगी देण्यावर 50 टक्के सवलत आहे. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीने रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला 1 लाख रुपये दान केले. यापैकी तुम्ही ५० हजार रुपयांवर कर सूट मागू शकता. म्हणजे ही रक्कम संपूर्ण रकमेतून उणे असेल. मात्र, यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरताना देणगीची पावती द्यावी लागेल.

    follow whatsapp