Vidhan Sabha Election : अर्ज मागे घेण्याची मुदत संपली, 24 मतदारसंघांमध्ये शेवटच्या क्षणी मोठ्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

आज 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी, अनेक ठिकाणी अजूनही बंडखोर आपल्या भूमिकांवर कायम आहेत. 

Mumbai Tak

मुंबई तक

04 Nov 2024 (अपडेटेड: 04 Nov 2024, 04:42 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूरमध्ये काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलला

point

आष्टीमध्ये चौरंगी लढत होणार

point

भिवंडीत शिंदेंच्या उमेदवारांचं टेन्शन वाढलं

राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून महायुती आणि मविकास आघाडी यांची आपापल्या मित्रपक्षांसोबत खलबतं सुरू होती. जागावाटपानंतरही गेले अनेक दिवस वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पेच कायम होता. अनेक इच्छूक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केल्याचं समोर आलं होतं. आज 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी, अनेक ठिकाणी अजूनही बंडखोर आपल्या भूमिकांवर कायम आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Sada Saravankar: 'अमित ठाकरे जिंकून येणं कठीण', 'ते' समीकरण समजवून द्यायला सरवणकर गेले राज ठाकरेंच्या घरी!

 

  1. कोल्हापूर उत्तर : काँग्रेसकडून मधुरिमा राजे यांची माघार. 
  2. पर्वती : काँग्रेस नेते आबा बागूल यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम, मविआला टेन्शन
  3. जुन्नर : आशा बुचके यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कामय. अजित पवार यांचे उमेदवार अतुल बेनकेंना आव्हान 
  4. वरूड-मोर्शी : भाजपकडून यावलकर तर देंवेंद्र भुयार हे अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडून मैदानात आहेत. त्यामुळे महायुतीला टेन्शन
  5. राजुरा : सुदर्शन निमकर आणि संजय धोटेंचा अर्ज मागे, भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांना दिलासा
  6. धुळे : शिंदेंच्या मनोज मोरे यांच्या माघारीमुळे भाजपच्या अनुप अग्रवाल यांना दिलासा
  7. नांदेड उत्तर : नांदेड उत्तरमध्ये मविआत बंडखोरी कायम. ठाकरेंकडून संगिता डख आणि काँग्रेसकडून अब्दुल गफार निवडणूक लढणार. त्यामुळे मविआला टेन्शन
  8. नांदेड उत्तर : या मतदारसंघात महायुतीतही बंडखोरी कायम आहे.शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याणकर आणि भाजपचे मिलिंद देशमुख मैदानात आहेत. 
  9. बीड : जयदत्त क्षीरसागर यांची माघार 
  10. बीड : ज्योती  मेटे निवडणूक लढण्यावर ठाम. महाविकास आघाडीला टेन्शन
  11. अष्टी : अष्टमीमध्ये चौरंगी लढत. भाजपचे बंडखोर भिमराव धोंडे लढण्यावर कायम. भाजप उमेदवार सुरेश धस यांच्यासाठी डोकेदुखी
  12. माजलगाव : रमेश आडसकर यांची बंडखोरी कायम, मविआला टेन्शन
  13. भिवंडी ग्रामीण :भाजपच्या स्नेहा पाटील यांचा अर्ज कायम. महायुतीला टेन्शन. शिंदेंच्या शिवसेनेच्या शांताराम मोरे यांचं टेन्शन वाढलं
  14. कल्याण पूर्व : काँग्रेसचे बंडखोर सचिन पोटेंचा अर्ज मागे, मविआला दिलासा
  15. दिंडोरी : शिंदेंच्या धनराज महाले यांची माघार. नरहरी झिरवाळ यांच्यासह महायुतीला दिलासा.
  16. जळगाव : ठाकरे गटातील बंडखोर कुलभूषण पाटील यांचा अर्ज कायम. मविआला टेन्शन.
  17. रिसोड : भाजपच्या आनंदराव देशमुख यांची बंडखोरी कायम. महायुतीला ताप
  18. श्रीगोंदा : भाजपच्या प्रतिभा पाचपुते यांची माघार. विक्रम पाचपुते हे भाजपचे अधिकृत उमेदवार. पेच संपला. 
  19. सांगली : भाजपच्या शिवाजी डोंगरे यांची माघार 
  20. गडचिरोली : भाजपच्या देवराव होळी यांचा अर्ज मागे.
  21. दौंड : अजित पवार गटाचे विरधवल जगदाळे यांची माघार. राहुल कुल यांच्यासह महायुतीला दिलासा.
  22. गुहागर : भाजपच्या संतोष जैतापूरकर यांची माघार
  23. शिरूर : महायुतीला दिलासा. प्रदीप कंद यांनी अर्ज मागे घेतली. ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरणार आहेत. 
  24. कसबा : कमल व्यवहारे यांची बंडखोरी कायम. मविआला टेन्शन.


अजित पवार यांच्या उमेदवारांविरोधात शिंदेंचे 7 उमेदवार रिंगणात.


 

    follow whatsapp