पीडित महिलेला झोपडीत बोलावले, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये दांडकं घालून... जादूटोण्याचा संशय अन् महिलेचा बळी

Crime News : एका गावात जादूटोण्याच्या संशयावरून एका महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. तिला झोपडीत नेऊन जबरदस्तीने दारू पाजली आणि नंतर तिच्या गुप्तांगात लाकडी दांडा घुसवून बेदम मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांनी चौघांच्या बेड्या ठोकल्या आहेत. या कृत्याने क्रूरतेची परिसिमा ओलांडली आहे.

crime news

crime news

मुंबई तक

09 Mar 2026 (अपडेटेड: 09 Mar 2026, 09:20 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मृतावर जादुटोणा केल्याचा संशय

point

पीडितेला दारू पाजली आणि गुप्तांगात लाकडी दांड्याने केलं नको तेच..

Crime News : छत्तीसगडमधील जशपूरनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका गावात जादूटोण्याच्या संशयावरून  महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. नंतर तिला झोपडीत नेऊन जबरदस्तीने दारू पाजून तिच्या गुप्तांगात लाकडी दांडा घुसवून बेदम मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना सन्ना पोलीस ठाणे परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : उल्हासनगरमध्ये ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या, शरीरावर केले 32 वार, बायकोनं देखील संपवलं जीवन

महिलेच्या गुप्तांगावर गंभीर जखमा

जशपूर जिल्ह्यात पोलिसांना महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा अहवाल मिळाला होता. या प्रकरणी मृताच्या भावाने सांगितलं की, घरात मोठ्या बहिणीचा मृतदेह आढळून आला होता, याबाबत तक्रार नोंदवली. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला, नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी तपासणीस पाठवला. तेव्हा पीडितेच्या शरीरावर आणि आजूबाजूला रक्ताचे डाग दिसू लागले होते. तसेच तिच्या गुप्तांगावर देखील गंभीर जखमा झाल्याचे दिसून आले होते.   

मृतावर जादुटोणा केल्याचा संशय

या अहवालानंतर, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत प्रकरणाचा शोध घेतला. पोलिसांनी केलेल्या तपासातून दिसून आले की, मृताचे तिच्या पतीसह वारंवार वाद व्हायचे. शेजारच्या एका जोडप्याला मृत महिलेवर जादुटोणा केल्याचा संशय होता. तिच्या वडिलांच्या कर्करोगासाठी जादूटोणा करण्यात आल्याचं बोललं जातंय. 

पीडितेला दारू पाजली आणि गुप्तांगात लाकडी दांड्याने केलं नको तेच..

जादूटोणा केल्याचा संशय असल्याने मृत महिलेच्या पती आणि सह पत्नीने शेजारच्या जोडप्यांसह तिची हत्या करण्याचा कट रचला होता. ती महिला भांडी धुण्यासाठी विहिरीकडे जाताना ते झोपडीत दारू पित होते. तिच्या पतीने तिला दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावले, त्यानंतर त्यांनी पीडितेच्या गुप्तांगात लाकडी दांडा घुसवून तिची हत्या केली. 

हे ही वाचा : गोड बोलून गर्लफ्रेंडला बोलावून घेतलं, नंतर बॉयफ्रेंडसह चौघांकडून सामूहिक बलात्कार, तरुणीची प्रकृती गंभीर

या हत्येनंतर आरोपींनी मृतदेह घरी आणला, नंतर बेडवर ठेवला आणि हे प्रकरण लपवण्यासाठी त्यावर ब्लँकेटने मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. आरोपी ओळख पटल्यानंतर, पोलिसांनी हत्या करताना वापरलेलं दांडकं जप्त केलं. तसेच चौघांना देखील अटक करण्यात आली आहे. 

    follow whatsapp