मुंबई: जॉगिंग करत असलेल्या टेक कंपनीच्या महिला CEOला कारने उडवलं; जागीच मृत्यू

मुंबई तक

19 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:09 PM)

Worli Sea Face Accident : वरळी सीफेसवर एका 38 वर्षीय महिलेला रविवारी पहाटे एका वेगवान एसयूव्हीने मागून धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. (Worli Bandra Sealink) वरळी-वांद्रे सीलिंकपासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या वरळी सीफेसवरील वरळी डेअरीजवळ सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. मृत महिलेचं नाव राजलक्ष्मी राम कृष्णन असं आहे. ती दादर-माटुंगा परिसरातील रहिवासी […]

Mumbaitak
follow google news

Worli Sea Face Accident : वरळी सीफेसवर एका 38 वर्षीय महिलेला रविवारी पहाटे एका वेगवान एसयूव्हीने मागून धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. (Worli Bandra Sealink) वरळी-वांद्रे सीलिंकपासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या वरळी सीफेसवरील वरळी डेअरीजवळ सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. मृत महिलेचं नाव राजलक्ष्मी राम कृष्णन असं आहे. ती दादर-माटुंगा परिसरातील रहिवासी आहे. ती एका टेक्नॉलॉजी फर्मची सीईओ होती, अशी माहिती मिळत आहे. (38-year-old woman hit by speeding car near Worli Sealink; Death on the spot)

हे वाचलं का?

पोलिसांनी गाडी जप्त केली

महिलेला ठोकरलेल्या कार चालकाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. टाटा नेक्सॉन या कारने त्या महिलेला धडक दिली होती. पोलिसांनी की गाडी जप्त केली आहे. पोलीस याबाबत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. त्याचबरोबर झालेल्या घटनेचा अधिक तपास केला जाईल, असं पोलीस सांगतायेत.

Yogesh Kadam: ‘हा अपघात नव्हता, माझ्या..’, रामदास कदमांच्या मुलाचा आरोप

कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटला

याबाबत अधित माहिती मिळते की, संबंधित महिला ही रविवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली होती. सीफेसजवळ चालत असताना एका कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि महिलेला ठोकरून दुभाजकावर जाऊन आदळली. ही धडक इतकी भिषण होती की महिला हवेत उडाली आणि लांब जावून जमिनीवर पडली. महिलेला तात्काळ नायर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे पोहोचताच तिला मृत घोषित करण्यात आले.

Pune-Solapur राष्ट्रीय महामार्गावर माय-लेकरांचा मृत्यू! स्वीफ्ट कारचा भीषण अपघात…

23 वर्षीय कारचालकाचे नाव सुमेर मर्चंट

सदरील कारचालक नशेत होता का? याबाबत वैद्यकीय चाचणीत समोर आलं आहे. आरोपी दारूच्या नशेत नसल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. पुढील तपास सुरू आहे. घटनेच्या वेळी वेगात असलेल्या चालकाला किरकोळ दुखापत झाली. या कारचालकाचे नाव सुमेर मर्चंट असून तो 23 वर्षांचा आहे. तो तारदेवचा रहिवासी आहे, अशी माहिती समोर आली आहे.

आरोपीला हॉलिडे कोर्टात हजर करणार

स्थानिक लोकांनी चालकाला पकडून वरळी पोलिसांच्या ताब्यात दिले. राजलक्ष्मी एका तंत्रज्ञान कंपनीच्या सीईओ होत्या. त्या शिवाजी पार्कमधील जॉगर्स ग्रुपचा एक भाग होत्या. कार चालकावर बेजबाबदार वाहन चालवल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला दादर येथील हॉलिडे कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Amitabh Bachchan: कुलीच्या सेटवर झाले घायाळ ते हात जळण्यापर्यंत… बिग बींचे अनेकदा झाले अपघात

    follow whatsapp