भाजपचं ‘मिशन मुंबई!’ अमित शाह येणार मुंबईत, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई तक

• 04:18 PM • 01 Sep 2022

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लवकरच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईत येणार आहेत. मुंबईत आल्यानंतर ते लालबागच्या राजाचं दर्शनही घेणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. काय म्हटलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येणार आहे. ते मुंबईत आल्यानंतर […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लवकरच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईत येणार आहेत. मुंबईत आल्यानंतर ते लालबागच्या राजाचं दर्शनही घेणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येणार आहे. ते मुंबईत आल्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेईन. आम्ही त्यांना विनंती केली आहे की त्यांच्या भेटीचा आणि विचारांचाही आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि त्यांच्यासोबत राजकीय बैठकाही होणार आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमित शाह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबई महापालिकांच्या दृष्टीने ते भाजपची रणनीती ठरवणार आहेत. भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही बैठक होणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं आहे?

अमित शाह मुंबईत येणार आहेत त्यांना भेटणार का? हा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आहे. आणि तुम्हाला माहित आहेच ना सरकारच्या मागे…. असं म्हणून त्यांनी एक पॉज घेतला. ज्यामुळे सर्वांमध्ये हशा पिकला. आज जे मजबूत सरकार आलं आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं योगदान आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्णपणे पाठीशी आहे असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. देशातलं सर्वाधिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याचं भाजपचं मिशन आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये मुंबईसह राज्यातल्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आगामी मुंबई दौरा हा मुंबई महापालिका निवडणूक आणि इतर महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई तकशी बोलताना ही माहिती दिली आहे. राज्यात गणेश उत्सव सुरू आहे. त्याच दरम्यान अमित शाह मुंबईत येणार आहे. अमित शाह येऊन नेमकी काय रणनीती ठरवणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp