मुंबई: महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज (20 डिसेंबर) संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या (21 डिसेंबर) या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असून, त्यापूर्वी JDS एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या अंदाजानुसार, राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, महायुतीचे पारडे जड दिसत आहे. पाहा Exit Poll नुसार नेमकी कोणाला किती नगर परिषदांमध्ये विजय मिळणार. पाहा संपूर्ण आकडेवारी.
ADVERTISEMENT
पाहा राज्यात विभागानुसार कोणाला किती जागा मिळणार
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध विभागांत पक्षांची स्थिती खालीलप्रमाणे राहू शकते:
1. विदर्भ
JDS एक्झिट पोल: विदर्भात कोणाला किती जागांवर मिळविणार विजय?
- भाजप - 61
- शिवसेना (शिंदे गट) - 07
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 05
- काँग्रेस - 19
- शिवसेना UBT - 01
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 00
- स्थानिक आघाडी - 03
- इतर - 04
विदर्भात भाजपने एकहाती वर्चस्व राखल्याचे दिसत आहे.
2. पश्चिम महाराष्ट्र
JDS एक्झिट पोल: प. महाराष्ट्रात कोणाला किती जागांवर मिळविणार विजय?
- भाजप - 27
- शिवसेना (शिंदे गट) - 07
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 12
- काँग्रेस - 01
- शिवसेना UBT - 01
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 02
- स्थानिक आघाडी - 21
- इतर - 00
साखर पट्ट्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे, मात्र येथे 'स्थानिक आघाड्या' किंगमेकर ठरू शकतात.
3. मराठवाडा
JDS एक्झिट पोल: मराठवाड्यात कोणाला किती जागांवर मिळविणार विजय?
- भाजप - 22
- शिवसेना (शिंदे गट) - 06
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 09
- काँग्रेस - 07
- शिवसेना UBT - 03
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 1
- स्थानिक आघाडी - 04
- इतर - 00
मराठवाड्यात भाजपने मुसंडी मारली असून शिवसेना (UBT) आणि शरद पवार गटाला संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे.
4. उत्तर महाराष्ट्र
JDS एक्झिट पोल: उत्तर महाराष्ट्रात कोणाला किती जागांवर मिळविणार विजय?
- भाजप - 24
- शिवसेना (शिंदे गट) - 07
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 03
- काँग्रेस - 00
- शिवसेना UBT - 01
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 00
- स्थानिक आघाडी - 02
- इतर - 00
उत्तर महाराष्ट्र: येथे भाजपला सर्वाधिक 24 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर शिंदे गटाला 07 जागा मिळू शकतात.
5. कोकण
JDS एक्झिट पोल: कोकण विभागात कोणाला किती जागांवर मिळविणार विजय?
- भाजप - 10
- शिवसेना (शिंदे गट) - 10
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 02
- काँग्रेस - 00
- शिवसेना UBT - 00
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 01
- स्थानिक आघाडी - 03
- इतर - 01
कोकणात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये बरोबरीची लढत असून दोन्ही पक्षांना प्रत्येकी 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.
. महाराष्ट्र
JDS एक्झिट पोल: महाराष्ट्रात कोणाला किती जागांवर मिळणार विजय?
पाहा महाराष्ट्रात नगर परिषद/नगर पंचायत निवडणुकांमध्ये कोणता पक्ष किती जागांवर मिळविणार विजय
-
भाजप: Exit Poll नुसार भाजप 140-152 नगरपरिषदांमध्ये मिळवू शकतो विजय
-
शिवसेना (शिंदे गट): Exit Poll नुसार शिवसेना (शिंदे गट)पक्ष 34-42 नगरपरिषदांमध्ये मिळवू शकतो विजय
-
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार): Exit Poll नुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)पक्ष 24-36 नगरपरिषदांमध्ये मिळवू शकतो विजय
-
काँग्रेस: Exit Poll नुसार काँग्रेस पक्ष 24-35 नगरपरिषदांमध्ये मिळवू शकतो विजय
-
शिवसेना UBT: Exit Poll नुसार शिवसेना (UBT) पक्ष 03-08 नगरपरिषदांमध्ये मिळवू शकतो विजय
-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार): Exit Poll नुसार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्ष 04-08 नगरपरिषदांमध्ये मिळवू शकतो विजय
-
स्थानिक आघाडी: Exit Poll नुसार स्थानिक आघाड्या 75-82 नगरपरिषदांमध्ये मिळवू शकतात विजय
संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता, सर्वाधिक नगराध्यक्ष आणि जागा भाजपकडे जाताना दिसत आहेत:
Exit Poll मधील महत्त्वाची निरीक्षणे
1. महायुतीची सरशी: भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट मिळून बहुतांश नगरपरिषदांवर वर्चस्व गाजवताना दिसत आहेत.
2. स्थानिक आघाड्यांचा प्रभाव: अनेक ठिकाणी प्रस्थापित पक्षांना स्थानिक आघाड्यांनी जोरदार टक्कर दिली आहे.
3. विरोधकांची स्थिती: काँग्रेस काही प्रमाणात विदर्भात तग धरून आहे, मात्र शिवसेना (UBT) आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.
ADVERTISEMENT











