BMC Election: 'भाजप-शिंदेंची BMC मध्ये येणार सत्ता.. ठाकरे बंधूना मिळतील 'एवढ्या' जागा', आकडे सांगत थेट केली भविष्यवाणी

BMC Election Result Predication: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिंदे गटाची सत्ता येऊ शकते असा अंदाज Vote Vibe च्या अमिताभ तिवारी यांनी व्यक्त केला आहे. पाहा त्यांच्या मते BMC मध्ये कोणाला किती जागा मिळू शकतात.

bmc election bjp and shiv sena shinde faction come to power in bmc thackeray brothers will get only 79 seats prediction made based on numbers vote vibe amitabh tiwari

BMC Election

मिलिंद खांडेकर, मॅनेजिंग एडिटर

20 Dec 2025 (अपडेटेड: 20 Dec 2025, 09:36 PM)

follow google news

मुंबई: बहुप्रतिक्षित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी त्याचे निकाल जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर 'Tak' चॅनलचे मॅनेजिंग एडिटर मिलिंद खांडेकर यांनी Vote Vibe चे सह-संस्थापक आणि राजकीय विश्लेषक अमिताभ तिवारी यांच्याशी संवाद साधला. ज्यामध्ये अमिताभ तिवारी यांनी मुंबई महापालिकेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय या चर्चेतून BMC निवडणुकीची गणिते कशी असतील यावर देखील भाष्य केलं आहे.

हे वाचलं का?

BMC निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा जिंकेल?, Vote Vibe च्या अमिताभ तिवारींचा अंदाज 

  • भाजप -  82 
  • शिवसेना (शिंदे गट) - 32
  • NCP (अजित पवार) - 05
  • शिवसेना UBT-मनसे - 79
  • काँग्रेस - 19
  • NCP (शरद पवार) - 00
  • इतर - 10

Vote Vibe च्या अंदाजानुसार मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. कारण गेली 25 वर्ष सतत शिवसेनेचं (अखंड) वर्चस्व होतं. पण आता मुंबईत भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा अंदाज खरा ठरल्यास उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसू शकतो. 

1. ठाकरे बंधूंची युती आणि नवीन समीकरणे

या निवडणुकीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे उद्धव ठाकरे (शिवसेना UBT) आणि राज ठाकरे (मनसे) यांचे एकत्र येणे. 2014 आणि 2017 च्या विधानसभा व महापालिका निवडणुकांचा कल पाहता, ठाकरे बंधू एकत्र आल्यास निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होऊ शकते. मात्र, या युतीसमोर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे (महायुती) मोठे आव्हान असेल.

हे ही वाचा>> उद्धव ठाकरेंचं राजकीय भविष्य आता मुंबईकरांच्या हातात, BMC निवडणुकीत पराभव झाला तर…

2. महायुतीचे पारडे जड?

अमिताभ तिवारी यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी आणि २०१७ च्या बीएमसी निकालांची तुलना करून एक अंदाज वर्तवला आहे:

  • महायुती (भाजप + शिंदे शिवसेना): 227 जागांपैकी महायुतीला साधारण 114 ते 133 जागा मिळण्याची शक्यता आहे. बहुमतासाठी 114 हा आकडा आवश्यक आहे, त्यामुळे महायुती सध्या काठावर पण आघाडीवर दिसतेय.
  • ठाकरे बंधूंची युती (Shiv Sena UBT + मनसे): उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीला 79 जागांच्या आसपास यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

3. मुस्लिम आणि मराठी मतांचे गणित

BMC च्या डेमोग्राफिक प्रोफाईलनुसार 40% मराठी, 20% मुस्लिम आणि 40% इतर (गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय) समाज आहे.

  • मुस्लिम मते: 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला (MVA) पाठिंबा दिला होता. मात्र, आता काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याने ही मते विभागली जाण्याची शक्यता आहे. जर ही बहुसंख्य मते ठाकरे युतीकडे वळाली, तरच ते भाजप-शिंदे जोडीला कडवे आव्हान देऊ शकतील.
  • मराठी मतं: मराठी मतांवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या तिन्ही नेत्यांचा दावा आहे. या मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

4. 'खरी शिवसेना' कोणाची? अंतिम रणसंग्राम

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी बाजी मारली होती, तर विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा जिंकून स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले. आता BMC निवडणूक ही 'खरी शिवसेना' नेमकी कोणाची याचा अंतिम निर्णय ठरवणारी निर्णायक निवडणूक ठरणार आहे. मुंबईतील अनेक विधानसभा मतदारसंघात शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळेल.

हे ही वाचा>> मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची 'MaMu’ कॉम्बिनेशनवर मदार?

5. महत्त्वाचे राजकीय बदल

  • काँग्रेस स्वबळावर: काँग्रेस या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणार आहे, ज्यामुळे मुस्लिम आणि दलितांच्या मतांमध्ये विभाजन होऊ शकते 
  • अजित पवार गट: महायुतीमध्ये असूनही, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बीएमसी निवडणुकीत भाजप-शिंदे यांच्यासोबत नसेल, असे सध्याचे चित्र आहे.

कागदावर सध्या भाजप आणि शिंदे शिवसेना युतीला जवळपास बहुमत असल्याचं दिसत असलं, तरी ठाकरे बंधू एकत्र आल्याने तयार होणारी 'भावनिक लाट' आणि मराठी-मुस्लिम मतांचे एकत्रीकरण झाल्यास मुंबई महापालिकेत मोठा उलटफेर होऊ शकतो.

    follow whatsapp