Nagar Parishad Voting LIVE: आज 'या' नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान सुरू... आतापर्यंत मतदानाची टक्केवारी किती?

आज म्हणजेच 20 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील 20 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे.

पाहा मतदानाचे लाइव्ह अपडेट्स...

पाहा मतदानाचे लाइव्ह अपडेट्स...

मुंबई तक

20 Dec 2025 (अपडेटेड: 20 Dec 2025, 12:37 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'या' नगर परिषदा व व नगरपंचायतींसाठी आज मतदानाला सुरूवात...

point

पाहा मतदानाचे लाइव्ह अपडेट्स...

Nagar Parishad Voting LIVE: आज म्हणजेच 20 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील 20 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाल्याचं सांगण्यात येत आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.  

हे वाचलं का?

या बातमीतून तुम्हाला मतदानासंदर्भात लाइव्ह अपडेट्स पाहता येतील... 

  • बारामती 

सकाळी 11:30 वाजेपर्यंत- 15.78% मतदान

  • घुग्गुस नगर परिषद 

11.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी- 14.01%

  • हिंगोली 

सकाळी 11:30 वाजेपर्यंत 
वसमत नगरपरिषद मतदान - 20.96%

  • सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

वर्धा नगर परिषद         : 7.74
हिंगणघाट नगर परिषद : 6.61
पुलगाव नगर परिषद     : 4.47
देवळी नगर परिषद       : 5.91

एकुण    :     6.32

  • यवतमाळ 

          सकाळी 11.30 वाजे पर्यंत

          14.62 टक्के मतदान

  • वर्धा 

वर्ध्याच्या देवळी वगळता 5 नगर पालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. देवळीत आक्षेप नोंदविल्यामुळे निवडणूक आज होत आहे. यासोबतच वर्ध्यातील एक प्रभाग व हिंगणघाट इथल्या एका प्रभागासाठी मतदान प्रकिया पार पडत आहे.

  • नांदेड 

नांदेडच्या धर्माबाद मध्ये भाजपा आमदार राजेश पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून धर्माबाद मधील इनानी मंगल कार्यालयात मतदाराला दाबून ठेवले.

  •  वाशिम 

          सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत

           मतदानाची टक्केवारी - 6.93 %

  • देऊळगाव राजा नगर पालिका

          सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत

          मतदानाची टक्केवारी - 4.38 %

    follow whatsapp