जर्मनीत गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष; पुण्याच्या ढोल-ताशा पथकाने जर्मनीकरांची मने जिंकली

यावर्षी जर्मनी येथील एरलांगन शहरात प्रथमच ढोल, ताशा व झांज पथकाच्या निनादात आणि लेझीम ठेक्यात पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्यात आला. मराठी विश्व फ्रांकेन,जर्मनी आयोजित या कार्यक्रमासाठी रमणबाग युवा मंच, या ढोल-ताशा पथकाला जर्मनी येथे पाचारण करण्यात आले होते. ढोल ताशा पथकाने पुण्याचा अलका चौक डोळ्यापुढे उभा केला. १८ जणांच्या ढोल, ताशा व झांज […]

Mumbai Tak

इम्तियाज मुजावर

• 01:37 PM • 09 Sep 2022

follow google news

यावर्षी जर्मनी येथील एरलांगन शहरात प्रथमच ढोल, ताशा व झांज पथकाच्या निनादात आणि लेझीम ठेक्यात पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्यात आला. मराठी विश्व फ्रांकेन,जर्मनी आयोजित या कार्यक्रमासाठी रमणबाग युवा मंच, या ढोल-ताशा पथकाला जर्मनी येथे पाचारण करण्यात आले होते. ढोल ताशा पथकाने पुण्याचा अलका चौक डोळ्यापुढे उभा केला. १८ जणांच्या ढोल, ताशा व झांज पथकासोबत ३८ महिला व पुरुष गटाने लेझीम सादर करून उपस्थित जर्मन आणि जर्मनीस्थित भारतीय गणेश भक्तांची मने जिंकली.

हे वाचलं का?

चिमुकले दिसले महापुरुषांच्या वेशभूषेत

कार्यक्रमात छोट्या मुलांनी महापुरुषांची वेशभूषा करून हजेरी लावली आणि उपस्थितांना मिनी इंडिया चे दर्शन करून दिले. कार्यक्रमाअंतर्गत मुलांना शाडू माती पासुन गणपती मूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये २५ मुलांनी सहभाग घेऊन छान व सुबक गणेश मूर्ती तयार केल्या. या भारतीय मुर्तिकारांसोबत जर्मनीच्या नागरिकांनाही फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही .

पारंपरिक पद्धतीने जर्मनीत गणरायाची स्थापना

गणेश उत्सव कार्यक्रमात प्रथेनुसार गणेश मूर्ती स्थापना, आरती, अथर्वशीर्ष पठण, राजोपचार, सवाद्य मिरवणूक व विसर्जन करण्यात आली. हा कार्यक्रम एरलांगन राटहाऊस म्हणजे तेथील शासकीय ॲाफीसच्या समोर आयोजित करण्यात आला होता. प्रथमच हा कार्यक्रम खुल्या मैदानावर व खूप मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला. जर्मनी आणि युरोप चा झेंडा जिथे कायम उंचावर फडकतो तिथे आपला भगवा फडकला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जर्मनस्थित सर्व भारतीयांनी परिश्रम घेतले. या उपक्रमास जर्मनीच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

800 लोकांचा सहभाग

या कार्यक्रमात जवळपास आठशे लोकांनी सहभाग नोंदवला. हे घडवून आणल्याबद्दल मराठी विश्व फ्रांकेन मंडळाचे संस्थापक रश्मी गावंडे, तृप्ती सपकाळ, अमोल कांबळे, प्रशांत गुळस्कर यांचे उपस्थितांनी कौतुक केले. साता समुद्रापार जाऊनही आपले उत्सव आपली संस्कृती भारतीय विसरत नाहीत, याचाच प्रतेय यावेळी आला.

    follow whatsapp