राहुल गांधींच्या सभेसाठी काँग्रेसची धावपळ, हायकोर्टात आज याचिकेवर सुनावणी

विद्या

• 03:03 AM • 14 Dec 2021

राहुल गांधींच्या सभेसाठी काँग्रेसची हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. 28 डिसेंबरला काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र राहुल गांधींच्या सभेवर प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण काँग्रेसने आता राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळवण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या शिवाजीपार्क येथील सभेला अजूनही […]

Mumbaitak
follow google news

राहुल गांधींच्या सभेसाठी काँग्रेसची हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. 28 डिसेंबरला काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र राहुल गांधींच्या सभेवर प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण काँग्रेसने आता राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळवण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

राहुल गांधी यांच्या शिवाजीपार्क येथील सभेला अजूनही राज्य सरकारकडून काँग्रेसला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी (14 डिसेंबर) या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे.

येत्या 28 डिसेंबरला काँग्रेस स्थापना दिवशी पहिल्यांदाच राहुल गांधी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत. शिवाजी पार्कवर होणारी ही काँग्रेसची पहिली सभा नसली तरी राहुल गांधींची मात्र पहिलीच सभा आहे. यापूर्वी 2003 आणि 2006 मध्ये काँग्रेसची सभा सोनिया गांधींच्या नेतृत्वात झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये राहुल गांधींकरता या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागितली गेली. मात्र, ती नाकारली गेली.

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी आहे. मात्र महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेना एकत्र नाहीत. अशात संजय राऊत आणि राहुल गांधी यांनी घेतलेली भेट महत्त्वाची आहे. या भेटीनंतर काँग्रेस-शिवसेनेची वाढती जवळीक ही भाजपसोबतच राष्ट्रवादीचीही डोकेदुखी ठरेल. शिवतीर्थ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या मैदानावर हिंदुत्वाच्या गर्जनाही घुमल्या आणि कॉमन मिनीमम प्रोग्रामवर आधारलेला शपथविधीही पार पडला. याच मैदानावर राहुल गांधी यांना सभा घ्यायची आहे. या सभेसाठी काँग्रेसने थेट हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सोबत आहे तरीही राहुल गांधी यांना सभेसाठी संमती मिळालेली नाही. राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यशैलीविषयी जाणून घेण्याची इच्छा असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊतांनी सांगितलं होतं. आता ते मुंबईत आल्यावर काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एवढंच नाही तर एमआयएम या पक्षाने जी तिरंगा रॅली मुस्लिम आरक्षणासाठी काढली होती त्यामध्येही असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधी मुंबईत येणार आहेत तेव्हा निर्बंध कुणी बघणार नाही. त्यावेळी ओमिक्रॉनचं संकट असणार नाही असं उपरोधिकपणे सरकारला सुनावलं होतं. एवढंच नाही तर राहुल गांधी येणार आहेत तेव्हा तुम्ही मुंबईत कलम 144 लागू करणार का? असाही सवाल ओवेसी यांनी विचारला होता.

    follow whatsapp