दिल्लीतील कोरोना आकडेवारी चिंता वाढवणारी, संसर्गाचे प्रमाण 20 टक्क्यांवर

मुंबई तक

• 03:46 PM • 18 Aug 2022

दिल्ली-एनसीआरमधील लोकांनी अद्याप कोरोनाला पराभूत केले नाही तोच विषाणूजन्य ताप आणि फ्लूने पुन्हा दार ठोठावले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी, त्याची भीती लोकांच्या मनातून निघून गेलेली आहे, ज्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. एक चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 30 दिवसांत, 10 पैकी 8 कुटुंबे कोरोना किंवा विषाणूजन्य ताप किंवा फ्लूच्या विळख्यात अडकली […]

Mumbaitak
follow google news

दिल्ली-एनसीआरमधील लोकांनी अद्याप कोरोनाला पराभूत केले नाही तोच विषाणूजन्य ताप आणि फ्लूने पुन्हा दार ठोठावले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी, त्याची भीती लोकांच्या मनातून निघून गेलेली आहे, ज्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. एक चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 30 दिवसांत, 10 पैकी 8 कुटुंबे कोरोना किंवा विषाणूजन्य ताप किंवा फ्लूच्या विळख्यात अडकली आहेत. लोक म्हणतात की त्यांना कोरोना किंवा सर्दी सारखी लक्षणे जाणवली आहेत.

हे वाचलं का?

पावसाळ्यात विषाणूजन्य ताप, सर्दी यांचे प्रमाण वाढणे सामान्य आहे. परंतु सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ते खूप वेगाने आणि मोठ्या संख्येने वाढत आहे. हे चिंता वाढवणारे आहे. गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार, दिल्ली-एनसीआरमधील 41 टक्के कुटुंब सध्या विषाणूच्या विळख्यात आहेत, तर या वर्षी जुलै ते ऑगस्ट दरम्यान, 82 टक्के कुटुंबांची तब्येत खराब आहे. अशा प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागे कोरोना हे देखील एक मोठे कारण असू शकते.

बहुतेक लोकांनी कोरोनाची लक्षण असल्याचं उघड

लोकलसर्कल नावाच्या प्लॅटफॉर्मने याबाबत माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणानुसार, 10 पैकी 8 कुटुंबांनी कबूल केले की त्यांच्या कुटुंबातील एक किंवा अधिक लोकांना कोविडसदृष लक्षणे जाणवत आहेत. ज्यामध्ये ताप, नाक वाहणे, थकवा इत्यादी लक्षणं दिसत आहेत.

अहवालानुसार, बहुतेक लोकांना कोविड किंवा व्हायरल ताप आहे की नाही हे होम किटच्या मदतीने शोधले. यामध्ये कोरोना किंवा व्हायरल ताप हे दोन्ही चिंता वाढवणारे आहे. कारण कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका नेहमीच असतो. विशेषत: लहान मुले किंवा ज्यांचे आरोग्य चांगले नाही, त्यांना धोका अधिक असतो.

लोकलसर्कलने दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबादमधील लोकांमध्ये हे सर्वेक्षण केले. यामध्ये 11 हजार लोकांचा समावेश होता. यामध्ये 63 टक्के पुरुष आणि 37 टक्के महिलांचा समावेश आहे. गेल्या 30 दिवसांत, 10 पैकी 8 लोकांमध्ये विषाणूची लक्षणे दिसून येत आहेत. कारण गेल्या वर्षी याच काळात जेव्हा हे सर्वेक्षण करण्यात आले होते, तेव्हा 10 पैकी केवळ 4 जणांना विषाणूची लागण होत होती.

दिल्लीत कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे.

दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोविड संसर्गाचे प्रमाण सुमारे 20 टक्के आहे. यासोबतच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. गेल्या 17 दिवसांत कोविडमुळे 87 लोकांचा मृत्यू झाला आहे. धोका लक्षात घेता 149 कंटेनमेंट झोन वाढवण्यात आले आहेत.

Omicron BA.2.75 या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे रुग्ण वाढत असल्याची भीती आहे. त्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या तरी डॉक्टर सावधगिरी बाळगण्यावर भर देत आहेत, तर सरकारचे म्हणणे आहे की लवकरात लवकर बूस्टर डोस मिळाल्यास हे टाळता येईल. दिल्लीशी संबंधित एक आकडाही समोर आला आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी 90 टक्के रुग्णांनी बूस्टर डोस घेतला नसल्याचे आढळून आले आहे.

    follow whatsapp