फरहान आणि शिबानी दांडेकर अडकले विवाहबंधनात, समोर आला पहिला फोटो

मुंबई तक

• 09:54 AM • 19 Feb 2022

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. या दोघांचं लग्न काही वेळापूर्वीच पार पडलं आहे. शिबानी दांडेकर आता अख्तर परिवाराची सून झाली आहे. खंडाळा या ठिकाणी या दोघांचं लग्न पार पडलं आहे. खास सूटमध्ये फरहान आणि लाल कलरच्या ड्रेसमध्ये शिबानी या फोटोत दिसत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी गर्दी […]

Mumbaitak
follow google news

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. या दोघांचं लग्न काही वेळापूर्वीच पार पडलं आहे. शिबानी दांडेकर आता अख्तर परिवाराची सून झाली आहे. खंडाळा या ठिकाणी या दोघांचं लग्न पार पडलं आहे. खास सूटमध्ये फरहान आणि लाल कलरच्या ड्रेसमध्ये शिबानी या फोटोत दिसत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी गर्दी केली आहे.

हे वाचलं का?

चार वर्षे शिबानी आणि फरहान हे एकमेकांना डेट करत होते. आता या दोघांचंही लग्न झालं आहे. ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे साथीदार झाले आहेत. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचं लग्न आज होणार अशी माहिती आधीच देण्यात आली होती. खंडाळा या ठिकाणी असलेल्या अख्तर कुटुंबाच्या फार्म हाऊसवर हे लग्न पार पडलं.

फरहान आणि शिबानीची ओळख एका रिअॅलिटी शो दरम्यान झाली होती. 2015 मध्ये ‘I Can Do That’ हा रिअॅलिटी शो टीव्हीवर सुरु होता. या शो मध्ये फरहान होस्ट होता तर शिबानी कंटेस्टंट होती. या शो दरम्यान त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर 2018 मध्ये दोघांनी आपल्या रिलेशीपवर शिक्कामोर्तब केला. सोशल मीडियावरही दोघांचे एकत्र फोटो शेअर करु लागले. फरहानचे हे दुसरे लग्न आहे. अधुना भबानीसोबत 16 वर्ष संसार केल्यानंतर दोघांनी 2017 मध्ये आपल्या वैवाहिक आयु्ष्याला पूर्णविराम दिला. त्यानंतर फरहानने मुव्ह ऑन करत शिबानीसोबत नाते जोडले.

    follow whatsapp