सांगली जिल्ह्यातील मिरज येथे टॉयलेट क्लिनींग, Acid आणि फिनेल बनवण्याच्या फॅक्टरीत आज आग लागून मोठा स्फोट झाला. सकाळी फॅक्टरीत पुजा करत असताना मालकाचं दुर्लक्ष झाल्यामुळे हा स्फोट झाल्याचं बोललं जातंय.
ADVERTISEMENT
फॅक्टरीचे मालक मिलींद बाबर हे सकाळी पुजा करत असताना शेजारी ठेवलेल्या प्लॅस्टिकला अगरबत्ती लागून त्याने पेट घेतला. त्याच्या शेजारीत फिनेल आणि Acid छोट्या-छोट्या टँकमध्ये भरुन ठेवण्यात आल्यामुळे जोरदार स्फोट झाला. या आगीत चार लाखांचं नुकसान झाल्याचं बोललं जातंय.
सांगली अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी २ बंबांच्या सहाय्याने ही आग तासाभरात आटोक्यात आणली आहे. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नसून पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि पोलीस उप-निरीक्षक सुभाष पाटील जखमी झाल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
