ताकदच पहायची असेल तर..योग्यवेळी दाखवू,संभाजीराजेंचं राणेंना प्रत्युत्तर

मुंबई तक

• 07:30 AM • 04 Jun 2021

ताकदच पहायची असेल तर योग्यवेळी दाखवून देऊ असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी भाजप खासदार नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे असंही संभाजीराजे यांनी सुनावलं आहे. काय म्हणाले होते नारायण राणे? शरद पवारांची संभाजीराजेंनी मराठा आरक्षणप्रश्नी भेट घेतली. ते आपल्या राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी […]

Mumbaitak
follow google news

ताकदच पहायची असेल तर योग्यवेळी दाखवून देऊ असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी भाजप खासदार नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे असंही संभाजीराजे यांनी सुनावलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले होते नारायण राणे?

शरद पवारांची संभाजीराजेंनी मराठा आरक्षणप्रश्नी भेट घेतली. ते आपल्या राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं? असा प्रश्न नारायण राणे यांनी विचारला होता. नारायण राणे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणासंबंधी भाष्य केलं. शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने बोललं पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली. तसंच रायगडावर कोण आहेत हो? आंदोलन लोकांमध्ये करावं. पेटवायला पण एक धमक लागते. खासदारकी संपता संपता हे सगळे कसे आठवायला लागले असं नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. आज संभाजीराजेंनी त्यांना उत्तर दिलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच संघर्ष पाहण्यास मिळतो आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही टीका करण्यात येते आहे. आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती आता नारायण राणे यांनीही टिकास्त्र सोडलं आहे. या टीकेनंतर संभाजीराजेंनी जोरदार प्रत्युत्तर देत ट्विट केलं आहे.

काय म्हटलं आहे संभाजीराजेंनी?

छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?

संभाजीराजे छत्रपती यांच्या खासदारकीची मुदत संपायला आली आहे त्यामुळे ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र जनता त्यांच्या बाजूने आहे का? असा प्रश्न नारायण राणे यांनी विचारला होता. ज्यानंतर संभाजीराजेंनी हे ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कुणाचंही थेट नाव घेतलं नसलं तरीही हा इशारा आपल्याच पक्षातील लोकांना त्यांनी दिला आहे हे उघड आहे.

    follow whatsapp