Pankaja Munde: ‘तोपर्यंत कोणी माझ्या गळ्यात हार घालायचा नाही, फेटाही बांधू नये’, पंकजा मुंडेंनी का केली अशी प्रतिज्ञा?

मुंबई तक

• 02:53 AM • 17 Aug 2021

रोहिदास हातागळे, बीड ‘जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत मी गळ्यामध्ये हार घालून घेणार नाही. तसंच जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय मान्य होत नाही तोपर्यंत मला कोणी फेटा देखील बांधायचा नाही.’ असा वेगळा ‘पण’च भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. पंकजा मुंडे बीड येथे समर्थ बूथ अभियानाच्या कार्यक्रमात […]

Mumbaitak
follow google news

रोहिदास हातागळे, बीड

हे वाचलं का?

‘जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत मी गळ्यामध्ये हार घालून घेणार नाही. तसंच जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय मान्य होत नाही तोपर्यंत मला कोणी फेटा देखील बांधायचा नाही.’ असा वेगळा ‘पण’च भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. पंकजा मुंडे बीड येथे समर्थ बूथ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला झेंडा दाखवल्यानंतर बीड येथे आयोजित समर्थ बूथ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. ‘माझं खूप बारकाईने लक्ष असतं, तुम्ही फक्त गल्लीमध्येच लक्ष ठेवा.’ असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना यावेळी सांगितलं आहे.

पुढे बोलताना पंकजा मुंडे असंही म्हणाल्या की, ‘परळी मतदारसंघात नंबर दोन धंदेवले खुश असून त्यांनी बीड जिल्ह्याचा जुगार मांडला आहे.’ अशी टीका धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पंकजा मुंडे यांनी केली आहे. ‘सर्वात जास्त निधी आणला असेल तर तो मीच आणला’ असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

पाहा पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या:

‘मी ही लढाई लढायचं ठरवलं आहे. रोज-रोज-रोज या गोष्टींना आपण बाजूला केलंच पाहिजे. बीड जिल्ह्याने एक सुंदर, वेगळं उदाहरण घालून दिलं पाहिजे. जोपर्यंत मराठा समाजाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत पंकजा मुंडे गळ्यामध्ये हार घालून घेणार नाही. तसंच जोपर्यंत ओबीसींच्या राजकीय मान्यतेचा विषय पूर्ण होत नाही तोपर्यंत माझ्या डोक्याला कुणीही फेटा बांधायचा नाही. अरे ज्याला खुर्चीवर बसायचं आहे त्याला हेच पाहिजे आपण भांडा आणि मरा..’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आरक्षणाविषयी भाष्य केलं.

Pankaja Munde: ‘मी त्यांचा अपमान का करु?’, Pritam Munde यांच्या मंत्रिपदावरुन पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

‘छत्रपती शिवरायांनी हे नाही केलं.. सोशल इंजिनिअरिंग करणारा या जगात, देशात कोणी पहिल माणूस असेल तर ते छत्रपती शिवराय होते. ज्यांनी या महाराष्ट्र सोशल इंजिनिअरिंग केलं. मुंडे साहेबांना विचारायचे की, तुमचे राजकीय गुरु कोण? तर ते सांगायचे मी राजकारण करताना छत्रपती शिवरायांचं राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवतो.’ असंही त्या यावेळी म्हणाल्या.

    follow whatsapp