Indurikar Maharaj यांच्या सासूचा BJP मध्ये प्रवेश!

अहमदनगर : वादग्रस्त विधानं आणि आपल्या अनोख्या किर्तन शैलीच्या आधारे नेहमीच चर्चेत असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी कारण ते नाही तर त्यांच्या सासूबाई ठरल्या आहेत. इंदुरीकर महाराज यांच्या सासू शशिकला पवार यांनी अहमदनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. […]

Mumbai Tak

मुंबई तक

09 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:25 AM)

follow google news

अहमदनगर : वादग्रस्त विधानं आणि आपल्या अनोख्या किर्तन शैलीच्या आधारे नेहमीच चर्चेत असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी कारण ते नाही तर त्यांच्या सासूबाई ठरल्या आहेत. इंदुरीकर महाराज यांच्या सासू शशिकला पवार यांनी अहमदनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला.

हे वाचलं का?

शशिकला पवार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे या गावच्या सरपंच आहेत. त्या नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत.

दरम्यान, भाजप प्रवेशाबद्दल बोलताना शशिकला पवार यांनी सांगितले कि, मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. निवडून आल्यानंतर काँग्रेसचे माजी मंत्री आणि संगमनेर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब थोरात यांना भेटायला स्वतः हुन गेले. मात्र तिथं कोणी विचारपूसही केली नाही. तसंच निवडणूक काळात त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास ही दिला. शिवाय निवडणुकीवेळी गावातील जनतेला काही आश्वासने दिली होती, आता गावाच्या विकासासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

महिलांची तुलना चप्पलशी :

दरम्यान, इंदुरीकरांच्या कीर्तनातील अनेक वक्तव्यं ही महिलांचा अपमान करणारी, त्यांना कमी लेखणारी असतात, असा आक्षेप अनेक महिला नोंदवत असतात. एकदा कीर्तनात लव्ह मॅरेजचं मत पटवून देताना इंदुरीकर महाराजांनी महिलांची तुलना थेट चप्पलेशी केली होती. यावरुन त्यांना बऱ्याच टिकेला आणि ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर देखील अनेकदा त्यांची महिलांविषयीची वक्तव्य वादग्रस्त ठरली होती.

अशातच आता इंदुरीकर महाराजांच्या घरातील महिलेनेच राजकारणात येऊन, सरपंच होऊन, एका प्रमुख राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या सासूचं कौतुक करत अनेक लोकं महाराजांना त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याची आठवण करुन देऊ लागली आहे.

इंदुरीकर महाराज काय म्हणाले होते?

“लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण पुरुष आहोत पुरुष. नवरा आहे नवरा. मह्या बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार तिचे? चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं”, असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते.

    follow whatsapp