जपानमध्ये खळबळ उडवून देणारी घटना घडलीये. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला. शिंजो आंबे हे भाषण करत असतानाच आरोपीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आबे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शिंजो आबे यांच्या छातीत गोळी लागली असून, त्यांना तातडीनं रुग्णालयात भरती करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार शिंजो आबे यांची प्रकृती गंभीर असून, गोळी लागल्यानं प्रचंड रक्तस्त्राव झाला आहे. गोळी लागल्यानंतर शिंजो आबे यांना ह्रदयविकाराचा झटकाही आला होता, अशीही माहिती समोर आलीये.
शिंजो आबे यांच्यावर जपानमधील नारा शहरात हा हल्ला करण्यात आला. हे शहर जपान पश्चिम भागात आहे. शिंजो आबे हे भाषण करत होते. त्याचवेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. शिंजो आबे भाषण करत असताना अचानक खाली कोसळले.
त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. शिंजो आबे अचानक कोसळून पडल्याने उपस्थित नागरिकांना सुरूवातीला काही कळलं नाही. त्यानंतर गोळ्या झाडल्याचा आवाज लोकांच्या कानावर पडला. त्यानंतर नागरिकांनी शिंजो आबे यांच्या दिशेनं धाव घेतली.
गोळीबारानंतर घटनास्थळी मोठी धावपळ उडाली होती. या घटनेनंतरचा एक व्हिडीओही समोर आला आहे. बीएनओ न्यूजच्या ट्विटर हॅण्डलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये काही लोक शिंजो आबे यांना मदत करताना दिसत आहे. तर काही लोक पळताना दिसत आहे. दरम्यान, गोळीबार प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. संशयित आरोपी ४१ वर्षांचा आहे. आरोपीने दोन गोळ्या शिंजो आबे यांच्या दिशेनं झाडल्याची माहिती आहे.
शिंजो आबे यांनी २०२० मध्ये पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. प्रकृती बरी नसल्याने त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक पंतप्रधान राहिले आहेत. जपानमध्ये संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी निवडणुका होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने शिंजो आबे हे प्रचार करत होते. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची ही घटना घडली.
ADVERTISEMENT