बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकलेल्या आणि प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेता बाबू उर्फ प्रियांशू क्षत्रिय याला पोलिसांनी अटक केली. नागपूर पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात त्याला अटक केली असून, त्याच्याकडून सोन्याचे दागिने, घड्याळं जप्त केली आहेत.
ADVERTISEMENT
नागपूरमधील मानकापूर पोलीस ठाणे हद्दीत चोरीची घटना घडली. लाखो रुपयांचा माल चोरीला गेला होता. नागपूर पोलिसांनी चोरीच्या घटनेचा पदार्फाश केला आणि या प्रकरणात एका विधीसंघर्षग्रस्त मुलासह तीन ते चार युवकांना पडकलं होतं.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचाही समावेश आहे. कलाकाराचं नाव प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू असं आहे. त्याचं वय 19 वर्ष आहे.
प्रियांशू क्षत्रियने कुठे लपवून ठेवल्या होत्या वस्तू?
चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी प्रियांशू आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला असता, प्रियांशूने गड्डी गोदाम स्थित बकरामंडीमध्ये कबुतराच्या पेटीत चोरीचा मुद्देमाल लपवला होता.
पोलिसांनी काही सोन्याचे दागिने आणि घड्याळं जप्त केली असून, त्यांची किंमत लाखो रुपये आहे.
प्रियांशू क्षत्रियने यापूर्वीही केल्या आहेत चोऱ्या
अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड चित्रपटात झळकलेल्या प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू क्षेत्री यापूर्वीही चोरीच्या प्रकरणात पकडला गेला आहे. झुंड चित्रपटानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मात्र, नंतरही त्याच्यात कोणताही बदल झालेला नाही.
प्रियांशू क्षत्रिय हा व्यसनाच्या आहारी गेलेला असून, मित्रांसोबत मिळून चोऱ्या करतो, अशी माहिती समोर आलीये. प्रियांशू क्षत्रिय याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT
