Trinmool Congress Worker Murder : एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री एसआयआर विरुद्ध जोरदार लढा देत आहेत; तर दुसरीकडे एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नसीर अली असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. त्याची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन विविध कालव्यांमध्ये फेकण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेहाचे सर्व तुकडे जमा केले आहेत. सोमवारी आलेल्या एका कॉलनंतर ते घराबाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचा काहीच ठावठिकाणा नव्हता. मात्र नागरिकांच्या निदर्शनांमुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली अन् यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
दोन संशयित ताब्यात
नसीर अली बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची मोटारसायकल एका कालव्यात सापडली होती. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याचा आरोप करत संतप्त जमावाने रास्ता रोको करत जोरदार निदर्शने केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि दोन दिवसांत रिजवान हसन मंडल आणि सागर गेन या दोन संशयितांना अटक केली. यातील मंडल हा बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे.
विविध कालव्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे
पोलिस कोठडीत असलेल्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर या भीषण हत्याकांडाचा उलगडा झाला. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बादुरिया परिसरातील विविध कालव्यांमध्ये शोध मोहीम राबवली. अनेक तासांच्या शोध कार्यानंतर नसीर अली यांच्या मृतदेहाचे छिन्नविच्छिन्न तुकडे पोलिसांच्या हाती लागले. हे दृश्य पाहून परिसरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा : रक्ताच्या थारोळ्यात व्हॅलेंटाईन्स डे! कारमध्ये सापडला प्रेमीयुगुलाचा मृतदेह; कोणी घातल्या गोळ्या?
अनैतिक संबंधातून हत्या
या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक तपासात अनैतिक संबंधांतून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नसीर अली यांच्या पत्नीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिस सध्या सर्व बाजूंनी तपास करत असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT











