Mumbai: ‘लालबागचा राजा’चं विसर्जन, साधेपणाने पार पडली संपूर्ण मिरवणूक!

मुंबई तक

• 07:48 AM • 19 Sep 2021

बाप्पाच्या भक्तीत दहा दिवस बघता बघता संपले. वर्षभरापासून वाट बघणाऱ्या गणेशभक्तांनी गणेश चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं आणि आज गणरायाला निरोप देण्याचा दिवसही उजाडला. राज्यात ठिकठिकाणी गणेश विसर्जनाला सुरुवात झाली असून, मुंबईसह राज्यभर प्रसिद्ध असलेला ‘लालबागचा राजा’सह मुंबई पुण्यातील महत्त्वाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा सुरू झाला आहे. दरवर्षी 24 तासांहून अधिक तास चालणारी लालबागची राजाची […]

Mumbaitak
follow google news

बाप्पाच्या भक्तीत दहा दिवस बघता बघता संपले. वर्षभरापासून वाट बघणाऱ्या गणेशभक्तांनी गणेश चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं आणि आज गणरायाला निरोप देण्याचा दिवसही उजाडला. राज्यात ठिकठिकाणी गणेश विसर्जनाला सुरुवात झाली असून, मुंबईसह राज्यभर प्रसिद्ध असलेला ‘लालबागचा राजा’सह मुंबई पुण्यातील महत्त्वाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा सुरू झाला आहे.

हे वाचलं का?

दरवर्षी 24 तासांहून अधिक तास चालणारी लालबागची राजाची विसर्जन मिरवणूक यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे आटोपती घेण्यात आली आहे. त्यामुळे यंदा साधारण चार वाजेच्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन हे गिरगाव येथील खोल समुद्रात करण्यात आलं.

‘वारुनिया संकटॆ आता आमुची सारी आता आमुची सारी

कृपेची सा‌ऊली देवा दीनावरि करी’

असं म्हणत आज पाणावलेल्या डोळ्यांनी गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला… विघ्नहर्त्यांला निरोप देत आहेत. कोरोनाच्या विघ्नामुळे सलग दुसऱ्या वर्षी गणेशांच आगमन व निरोप सोहळा साधेपणानं पार पडत आहे.

आज अनंत चतुर्दशी दिनी गणरायाला निरोप दिला जात आहे. गणपती विसर्जनाची तिथी 19 सप्टेंबर पासून सुरु होऊन 20 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

– सकाळचा मुहूर्त – 7:39 ते 12:14 पर्यंत

– दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत

– संध्याकाळचा मुहूर्त – संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46

– रात्रीचा मुहूर्त – रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर)

– सकाळचा मुहूर्त – सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 (20 सप्टेंबर)

– अनंत चतुदर्शी तिथी प्रारंभ – सकाळी 05 वाजून 06 मिनिटांनी

– अनंत चतुदर्शी तिथी समाप्ती – दुसऱ्या दिवशी सकाळी 07 वाजून 35 मिनिटांपर्यंत

    follow whatsapp