ठाणे जिल्ह्यातील आटगाव आणि थानसित स्थानकादरम्यान एक मोठा अपघात होता होता टळल्याचं समोर आलं आहे. रेल्वे ट्रॅकवर ठेवलेल्या लांब लोखंडाच्या तुकड्याला इंजिन धडकलं असून, सुदैवानं मोठी दुर्घटना झाली नाही. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) तपास सुरू केला आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही घटना सोमवारी पहाटे साडेतीन वाजता मध्य रेल्वे मार्गावर घडली.
ADVERTISEMENT
जीआरपी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'एक इंजिन कसारा स्थानकाकडे जात असताना रेल्वे ट्रॅकवर ठेवलेल्या फूटभर लांब असलेल्या जाड लोखंडी तुकड्याला धडकलं. हा घातपाताचा प्रकार होता का हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, यामुळे रेल्वेचा अपघात होऊन मोठी दुर्घटना घडून लोकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता होती.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यापूर्वी देशमुख कुटुंबाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
एका हवालदाराने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे .
हे ही वाचा >> Mumbai Crime News : चोरी करायला घरात घुसला चोर, काहीच नाही मिळालं म्हणून महिलेचा मुका घेऊन पळाला...
चिंतेची बाब म्हणजे चार महिन्यांपूर्वी याच परिसरात रुळावर सिलिंडर टाकून कालिंदी एक्स्प्रेस गाडीच्या घातपाताचा प्रयत्न झाला होता. 8 सप्टेंबर 2024 रोजी शिवराजपूर स्थानकापूर्वी सुमारे एक किलोमीटर अंतरावर काही स्फोटक पदार्थांसह एक मोठा एलपीजी सिलिंडर सापडला होता.
ADVERTISEMENT
