ऊन, वारा, पाऊस, दिवस, रात्र... प्रत्येक परिस्थिती ठेवणार करडी नजर, भारत 'ही' एयर डिफेन्स सिस्टिम खरेदी करणार

Indian Army : आरएफपी दस्तऐवजानुसार, ही प्रणाली इन्फ्रा-रेड होमिंग क्षेपणास्त्र, मॅनपोर्टेबल लाँचिंग यंत्रणा आणि योग्य दृष्टी प्रणालींनी सुसज्ज असावी. जेणेकरून लढाऊ विमान, वाहतूक विमान, हेलिकॉप्टर आणि मानवरहित हवाई प्रणाली (UAS) वर ती थेट मारा करू शकेल.

Mumbai Tak

मुंबई तक

04 May 2025 (अपडेटेड: 04 May 2025, 11:29 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारताची ताकद वाढणार, नवी सुरक्षा यंत्रणा खरेदी करणार

Indian Army : भारतीय सैन्याच्या हवाई संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. संरक्षण मंत्रालयाने अद्ययावत असलेल्या नेक्स्ट जनरेशन हवाई संरक्षण प्रणाली (VSHORADS (NG)) ची खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी, संरक्षण मंत्रालयानं शनिवारी प्रस्ताव दाखल केला आहे. भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती उपलब्ध झाल्याचं दिसतंय.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> कपलला अडवलं, खोट्या केसची धमकी देत लाच मागितली, पुढे असं काय घडलं की तीन पोलिसांनाच निलिंबित केलं?

मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, "BUY (भारतीय)" श्रेणी अंतर्गत 48 लाँचर्स, 48 नाईट-व्हिजन साइट्स, 85 क्षेपणास्त्रे आणि एक क्षेपणास्त्र चाचणी केंद्र खरेदी करण्याची योजना आखली जातेय. दिवस असो किंवा रात्र, वादळ असो किंवा पाऊस तसंच बर्फाच्छादित भागात हवाई लक्ष्ये नष्ट करण्यास सक्षम असणारी ही प्रणाली असेल. मंत्रालयाने संभाव्य बोली लावणाऱ्यांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. 

हवाई धोक्यांमुळे उचललं मोठं पाऊल

संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे की, सतत बदलणाऱ्या हवाई धोक्यांना तोंड देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. लष्कराच्या हवाई संरक्षण युनिटला मॅनपोर्टेबल आणि इन्फ्रारेड होमिंग (IR) तंत्रज्ञानाने सुसज्ज प्रणालीची आवश्यकता आहे. टर्मिनल आणि पॉइंट संरक्षण प्रदान करेल अशी ती प्रणाली असली पाहिजे. "फायर अँड फॉरगेट" क्षमतेनं डिझाइन केलेली आहे ही प्रणाली असली पाहिजे. जेणेकरून एकदा लक्ष्यावर हल्ला झाल्यानंतर, क्षेपणास्त्र सोडल्यानंतरही ते नियंत्रित करण्याची आवश्यकता भासणार नाही. 

हे ही वाचा >> Maharashtra Board SSC Result 2025 : 10 वीच्या निकालाची तारीख लवकरच, रोल नंबर 'असा' करा डाऊनलोड

आरएफपी दस्तऐवजानुसार, ही प्रणाली इन्फ्रा-रेड होमिंग क्षेपणास्त्र, मॅनपोर्टेबल लाँचिंग यंत्रणा आणि योग्य दृष्टी प्रणालींनी सुसज्ज असावी. जेणेकरून लढाऊ विमान, वाहतूक विमान, हेलिकॉप्टर आणि मानवरहित हवाई प्रणाली (UAS) वर ती थेट मारा करू शकेल.

मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणे

व्हीएसएचओआरएडीएस (NG) ची ही खरेदी केवळ सैन्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या आवश्यक नाही, तर स्वदेशी संरक्षण उत्पादनांनाही प्रोत्साहन देणार आहे. 'BUY (इंडियन)' श्रेणी अंतर्गत हे पाऊल मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये आत्मनिर्भरतेमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

    follow whatsapp