Ladki Bahin Yojana मध्ये 12 हजार 431 पुरुषांची घुसखोरी, राज्य सरकारच्या तिजोरीवर 'एवढा' आर्थिक भार

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्य सरकारने या योजनेअंतर्गत महिलांना अर्थसहाय्य केलं. पण, यात 12 हजार 431 पुरुषांनीही या योजनेचा गैरवापर करत लाभ मिळवला आहे.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

मुंबई तक

• 03:22 PM • 21 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता

point

12 हजार 431 पुरुषांकडून योजनेचा गैरवापर

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्य सरकारने या योजनेअंतर्गत महिलांना अर्थसहाय्य केलं. पण, यात 12 हजार 431 पुरुषांनीही या योजनेचा गैरवापर केल्याचं समोर आलं आहे. या योजनेच्या अंतर्गत, पात्र महिलांनाच 1,500 ची आर्थिक मदत करण्यात येईल असे सांगितले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शनिवार वाड्यात नमाज पठणावरून वादंग, मेधा कुलकर्णी रस्त्यावर, हिंदू संघटना एकवटताच गोमूत्राने केलं शुद्धीकरण

12 हजार 431 पुरुषांनी या योजनेचा गैरफायदा घेतला

एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि बालविकास विभागाने पुष्टी केली की, पाडताळणी प्रक्रियेदरम्यान, असे आढळून आले की, तब्बल 12 हजार 431 पुरुषांनी या योजनेचा गैरफायदा घेतला. तपासणीनंतर, त्या सर्वांना लाभार्थ्यांच्या यादीतून काढून टाकण्यात आले. केवळ पुरुषच नाही,तर या योजनेसाठी पात्र नसलेल्या 77 हजार 980 महिलांनाही अनेक महिने आर्थिक मदत मिळाली.

12 हजार 431 पुरुषांनी गैरफायदा घेत योजनेचा लाभ मिळवल्याने सरकारच्या तिजोरीवर मोठा परिणाम झाला आहे. आरटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांना महिन्याभरात गरमहा 1500 रुपये देण्यात आले. यात अपात्र महिलांना 12 महिन्यांसाठी रक्कम देण्यात आली. एकूण 164.52 कोटी रुपये सरकारने अपात्रांच्यात खात्यात हस्तांतरित केले. यापैकी 24.24 कोटी रुपये पुरुषांकडे आणि 140.28 कोटी रुपये महिलांकडे गेले. 

योजनेचा लाभ किती कोटी लोकांना? 

संबंधित योजना ही 2024 मध्ये, राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या केवळ चार महिने आथीच सुरु करण्यात आली होती. महायुती सरकारने 199.81 कोटींचे बजेट जाहीर केले होते. दरम्यान, या योजनेचा लाभ 2.41 कोटी लोकांनी घेतला आहे. तसेच 26 लाख अपात्र लाभार्थी महिलांची ओळख पटली असल्याचे महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑगस्ट 2025 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पडताळणीनंतर अपात्र आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांकडून सोलापुरात राष्ट्रवादीला धक्के, अजित पवारांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिलेदार पाठवला

26.34 लाख खात्यांतील हस्तांतर थांबल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारी सूत्रांनूसार, जून-जुलै महिन्यात खात्यात हस्तांतरित करण्यात आलेल्या संपूर्ण रक्कमेचे अद्याप पूर्णपणे मूल्यांकन झालेलं नाही आणि पडताळणी जसजशी पुढे जाईल तसतसा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

    follow whatsapp