देवेंद्र फडणवीसांकडून सोलापुरात राष्ट्रवादीला धक्के, अजित पवारांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिलेदार पाठवला

मुंबई तक

Solapur Politics : देवेंद्र फडणवीसांकडून सोलापुरात राष्ट्रवादीला धक्के, अजित पवारांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिलेदार पाठवला

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीसांकडून सोलापुरात राष्ट्रवादीला धक्के

point

अजित पवारांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिलेदार पाठवला

Solapur Politics : काही दिवसांपूर्वी सोलापुरातील चार माजी आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार बोलून दाखवला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पडद्यामागून सूत्र हलवली आणि माजी आमदारांना गळ्याला लावण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, काँग्रेसचा 1 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची चिन्ह आहेत. देवेंद्र फडणवीसांनी सोलापुरात मित्र पक्षांना धक्के दिल्यानंतर आता अजित पवारांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिलेदार पाठवलाय. 

मंत्री दत्तात्रय भरणेंकडून सोलापुरात डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न 

सोलापुरात राष्ट्रवादीमधील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत माजी आमदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक सुरु झालीये. यावेळी माजी आमदार  संजयमामा शिंदे,कल्याण काळे, उमेश पाटील, मिनल साठे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेले आमदार पुत्र रणजित शिंदे ही उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. 

हेही वाचा : राज ठाकरेंकडून पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', पीएम मोदी अन् शिंदेंच्या आमदारांचे व्हिडीओ दाखवले, निवडणूक आयोगाला घेरलं

 
सोलापुरातून भाजपमध्ये प्रवेश करणार असणारे नेते कोण?

हे वाचलं का?

    follow whatsapp