अजितदादांकडून खेचून आणून उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं तिकीट दिलं, तोच माजी आमदार आता भाजपात प्रवेश करणार

मुंबई तक

Deepak Aaba Salunkhe likely to join bjp : अजितदादांकडून खेचून आणून उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं तिकीट दिलं, तोच माजी आमदार आता भाजपात प्रवेश करणार

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंना धक्का, सोलापुरातील नेत्याने साथ सोडली

point

माजी आमदार आता भाजपात प्रवेश करणार

Deepak Aaba Salunkhe likely to join bjp : सोलापुरात भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही धक्का दिलाय. कारण सोलापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दीपक आबा साळुंखे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुराती बडे नेते गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. दीपक आबा साळुंखे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून ठाकरेंच्या शिवसेनेते आले होते. मात्र, त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

विधानसभा निवडणुकीत दीपक आबा साळुंखेंचा पराभव 

दीपक आबा साळुंखे सांगोला तालुक्यातील महत्त्वाचे नेते मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते विधानपरिषदेचे आमदार देखील झाले होते. बरेच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले दीपक आबा साळुंखे 2024 ची विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले होते. सांगोल्यातून त्यांनी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. 

हेही वाचा : ATS चा अधिकारी असल्याचं सांगून 70 वर्षीय वृद्धाकडून 1.44 कोटी उकळले, पुण्यातील डिजिटल अरेस्टचं मोठं प्रकरण

सांगोला विधानसभा निवडणूक 2024 कोणाला किती मतं पडली? 

बाबासाहेब देशमुख - 116256 मतं - (25386 मतांनी विजयी)  
शहाजीबापू पाटील - 90870 मतं 
दीपक आबा साळुंखे - 50962 मतं 

हे वाचलं का?

    follow whatsapp