बीड: 'मराठा समाजाला बोकांडी बसवून घ्यायचं?', छगन भुजबळ थेट असं का म्हणाले?
ओबीसी समाजाच्या महाएल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे. पाहा छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

बीड: बीडमधील ओबीसी समाजाच्या महाएल्गार सभेतून मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणावरून जोरदार टीका केली आहे. 'आम्ही गप्प बसायचं आणि मराठा समाजाला बोकांडी बसवून घ्यायचं आहे. कुठला न्याय आला?' असं म्हणत छगन भुजबळांनी प्रचंड संताप व्यक्त केला. मराठा समाजाला ओबीसीमधून हवं असलेल्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं. त्यामुळे ओबीसी नेते हे आता पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, बीडमधील या महाएल्गार सभेला धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.
छगन भुजबळांची घणाघाती टीका, पाहा नेमकं काय म्हणाले!
भाजपच्या नेत्यांसुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना आवरा.. तुम्ही आता केलं ना.. आम्ही कोर्टात लढू. तुम्ही आता उलटेसुलटे आदेश दिले ना.. आम्ही रस्त्यावर लढू, निवडणुकीत लढू. नाही तरी आतापर्यंत तुमच्या पाट्या उचल्यातच नाही आम्ही. एक दिवस असा येईल की, आमचा हा गोरगरीब ओबीसी हा सुद्धा पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंज्या उचलायला लावल्याशिवाय राहणार नाही.
हे ही वाचा>> कुणबी दाखले दिलेल्यांची संख्या मोजा, वेगळा प्रवर्ग करा; गोपीचंद पडळकर काय काय म्हणाले?
हे तुम्ही केलंत.. हे ओढवून आणलं संकट.. मराठा समाजातील नेत्यांना जेव्हा मी सांगतो बोला याच्यावर तेव्हा सगळे मूग गिळून बसले आहेत. ज्याचा अभ्यास नाही, आरक्षण कशासाठी खातात हे माहीत नाही. तो सांगतो आणि तुम्ही टाळ्या वाजवता गप्प बसता.. फक्त राजकीय फायद्यासाठी.