कोल्हापुरातील 6 नृत्यांगणांचा आत्महत्येचा प्रयत्न, एकाच वेळी सहा जणींनी हाताच्या नसा कापल्या
Kolhapur News : कोल्हापुरातील 6 नृत्यांगणांचा आत्महत्येचा प्रयत्न, एकाच वेळी सहा जणींनी हाताच्या नसा कापल्या
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोल्हापुरातील 6 नृत्यांगणांचा आत्महत्येचा प्रयत्न

एकाच वेळी सहा जणींनी हाताच्या नसा कापल्या
Kolhapur News : कोल्हापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. महिला सुधारगृहात राहणाऱ्या सहा नृत्यांगनांनी एकत्रितपणे आत्महत्येचा प्रयत्न केला. सहा नृत्यांगणांनी आपल्या हाताच्या नसा कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र वेळेवर ही बाब लक्षात आल्याने सुधारगृह प्रशासनाने तात्काळ कारवाई करत सर्वांना रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा : पतंग आणण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडला, परत येताना आनंद गगनात मावेना; पण 9 वर्षीय कनिष्कासोबत आक्रित घडलं
मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी केलेल्या छापेमारीदरम्यान या सहा नृत्यांगनांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना महिला सुधारगृहात ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्यांनी सामूहिकरीत्या आत्महत्येचा प्रयत्न करत स्वतःच्या हाताच्या नसा कापल्या. परंतु प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून त्यांच्या जीवावर आलेले संकट टाळले. सध्या सर्व नृत्यांगना रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या