"शेजाऱ्याकडे माझे अश्लील फोटो अन् तब्बल दीड वर्षे..." हॉटेलमध्ये पकडल्या गेलेल्या महिलेचा धक्कादायक खुलासा!
एका महिलेने थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचून एका तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावेळी, पीडितेने आरोपी तरुणावर गंभीर आरोप केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हॉटेलमध्ये पकडल्या गेलेल्या महिलेचा धक्कादायक खुलासा!

शेजारी राहणाऱ्या तरुणावर केले गंभीर आरोप

नेमकं प्रकरण काय?
Crime News: एका महिलेने थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचून एका तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावेळी, पीडितेने आरोपी तरुणावर गंभीर आरोप केले. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, तिच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाला पीडितेच्या लग्नाआधीच्या तिच्या प्रियकाराबद्दल माहिती मिळाली होती. याच गोष्टीचा फायदा घेत तो तरुण पीडितेला मागील दीड वर्षांपासून ब्लॅकमेल करत होता.
खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
पीडित महिलेने तक्रार करताना सांगितलं की, आरोपी तरुण पीडितेच्या आधीच्या प्रियकरासोबतच्या फोटो आणि व्हिडीओचा वापर करत तिला धमकी देत होता. तसेच, आरोपी पीडितेला सतत म्हणायचा की, "जर तू माझं ऐकलं नाहीस तर तुझे प्रायव्हेट फोटो व्हायरल करेन आणि तुझ्या प्रियकराबद्दल तुझ्या पतीला तसेच कुटुंबियांना सगळं काही सांगेन."
हे ही वाचा: मुंबईची खबर: देशाची वॉटरफ्रंट राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाणार! वांद्रेतील 140 जमिनीवर म्हाडाचा मेगा प्रोजेक्ट...
वारंवार हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवायचा
आरोपीच्या या धमक्यांना घाबरून महिलेने बऱ्याचदा त्या तरुणाला पैसे सुद्धा दिले. महिलेने याबाबत सांगितलं की, आरोपी वेळोवेळी तिला भेटण्यासाठी बोलवायचा आणि तिने भेटायला नकार दिल्यास तिला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. नुकतंच, त्या तरुणाने पीडितेला फोन करुन मऊरानीपुर येथील एका हॉटेलमध्ये बोलवलं आणि तिथे त्याने बळजबरीने महिलेवर बलात्कार केल्याचा पीडितेने आरोप केला. पीडितेचा पती त्या हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर, आरोपी तरुणाने त्याला खोटं सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचं महिलेने सांगितलं.
हे ही वाचा: Govt Job: सीमा सुरक्षा दलात सहभागी होण्यासाठी आत्ताच करा अर्ज... 'या' पदांसाठी निघाली भरती!
पीडितेचे तरुणावर गंभीर आरोप
याशिवाय, पीडित महिलेने तरुणावर बरेच गंभीर आरोप केले आहेत. याबाबत पीडित महिलेने स्पष्टपणे सांगितलं की, तिच्या पतीने ज्या तरुणाला पकडलं तोच गेल्या दीड वर्षांपासून तिला ब्लॅकमेल केलं आणि तिचं शारीरिक शोषण केलं. तसेच, हॉटेलमध्ये तिच्या पतीने आरोपीला बेदम मारहाण केली तरीसुद्धा त्या तरुणाने पीडितेचे फोटो आणि व्हिडीओ करण्याची धमकी दिल्याचं महिलेने स्पष्ट केलं. पोलिसांनी आता महिलेच्या तक्रारीच्या आधारे, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.