गाढ झोपेत असलेल्या 20 वर्षीय तरूणाचं गुप्तांगच कापलं, अन् 'तो' झाला फरार, नेमका प्रकार काय?

मुंबई तक

रात्री एक तरुण त्याच्या खोलीत झोपला असताना कोणीतरी त्याचे गुप्तांग कापून पळून गेल्याची धक्कादायक घटना प्रयागराजमध्ये उघडकीस आली आहे.

ADVERTISEMENT

a stranger entered house and cut off private parts of a young man who was sleeping soundly accused fled scene immediately
झोपेत असलेल्या 20 वर्षीय तरूणाचं गुप्तांगच कापलं
social share
google news

प्रयागराज: एक तरुण त्याच्या खोलीत गाढ झोपेत असताना कोणीतरी त्याच्या खोलीत शिरून थेट गुप्तांग कापून पळून गेल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये उघडकीस आली आहे. जेव्हा तरुण जागा झाला तेव्हा तिथे कोणीही नव्हते. घडलेल्या प्रकाराने तो तरूण प्रचंड घाबरला रक्ताने माखलेला अवस्थेतच तो तरुण थेट आपल्या भावाच्या खोलीत धावत गेला आणि तिथेच बेशुद्ध पडला. झोपेत असताना घडलेल्या या विचित्र घटनेने त्याचे कुटुंब आणि ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, परंतु हा प्रकार नेमका का आणि कोणी केला याबाबत अद्याप काहीही माहिती समोर येऊ शकलेली नाही.

झोपत असतानाच कापलं तरुणाचं गुप्तांग

ही घटना मऊआईमा पोलीस स्टेशन परिसरात घडली. 20 वर्षीय तरुण त्याच्या खोलीत गाढ झोपेत होता. झोपेत असताना कोणीतरी येऊन अचानक त्याचे गुप्तांग कापले आणि तो गायबही झाला असा या प्रकरणात आरोप करण्यात आला आहे. जेव्हा तो तरुण वेदनेने जागा झाला तेव्हा तो रक्ताने माखलेला होता. ते सगळं दृश्य पाहून त्याला प्रचंड धक्का बसला. तथापि, त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्याला कोणीही दिसले नाही. वेदनेने विव्हळत तो तरुण त्याच्या भावाच्या खोलीत गेला आणि बेशुद्ध पडला. लोकांनी आरडाओरडा केला तेव्हा जवळच गर्दी जमली. तथापि, आरोपीची ओळख अद्याप अज्ञात आहे.

हे ही वाचा>> "शेजाऱ्याकडे माझे अश्लील फोटो अन् तब्बल दीड वर्षे..." हॉटेलमध्ये पकडल्या गेलेल्या महिलेचा धक्कादायक खुलासा!

कुटुंबीयांनाही बसला धक्का

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तरुणाचे अद्याप लग्न झालेले नव्हते. त्याला पाच भाऊ आणि दोन बहिणी आहेत, त्यापैकी तो सर्वात धाकटा आहे. कुटुंबाने पीडितेला शहरातील स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात दाखल केले आहे, जिथे तो उपचार घेत आहे. मऊआईमा पोलिस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध देखील सुरू केला आहे. तथापि, घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हे ही वाचा>> सासूचं आणि जावयाचं होतं लफडं, संबंध ठेवल्याचे व्हिडिओही बनवले, नंतर पत्नीसह तिच्या आईने नको तेच...

दरम्यान, या विचित्र घटनेने पोलीसही चक्रावले आहेत. कारण थेट घरात घुसून तरुणाचं गुप्तांग कापून आरोपी अचानक कसा काय फरार झाला? हा प्रश्न पोलिसांनाही सतावत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp