लिव्ह-इन-पार्टनरकडून गर्भवती महिलेची निर्घृण हत्या! पीडितेवर चाकूने हल्ला केला अन् अखेर पतीने सुद्धा...
एका गर्भवती महिलेची तिच्या आधीच्या लिव्ह-इन-पार्टनरने निर्घृणपणे हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. इतकेच नव्हे तर, या घटनेनंतर पीडितेच्या पतीने आरोपी तरुणाला पकडलं आणि त्याला मारून टाकल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लिव्ह-इन-पार्टनरकडून गर्भवती महिलेची निर्घृण हत्या!

पीडितेवर चाकूने हल्ला केला अन्...
Crime News: एका गर्भवती महिलेची तिच्या आधीच्या लिव्ह-इन-पार्टनरने निर्घृणपणे हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. इतकेच नव्हे तर, या घटनेनंतर पीडितेच्या पतीने आरोपी तरुणाला पकडलं आणि त्याला मारून टाकल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित घटना दिल्लीतील नबी करीम परिसरातील असल्याची माहिती आहे. पोलिसांनी रविवारी या घटनेबद्दल माहिती दिली. प्रकरणातील शालिनी (22) आणि आशु उर्फ शैलेंद्र अशी प्रकरणातील मृतांची नावे समोर आली आहे. खरंतर, मृत महिला ही दोन मुलांची आई होती. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, आपल्या पत्नीचा बचाव करताना 23 वर्षीय आकाश जखमी झाला. आकाशवर सुद्धा बऱ्याचदा चाकूने वार करण्यात आले असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
चाकूने हल्ला अन् निर्घृण हत्या
पोलिसांनी या प्रकरणाबाबत सांगितलं की, ही घटना शनिवारी रात्री 10:15 च्या सुमारास घडली. त्यावेळी आकाश आणि शालिनी कुतुब रोडवर शालिनीची आई शीलाला भेटण्यासाठी जात होता. तिथे अचानक आशु नावाचा तरुण आला आणि त्याने आकाशवर चाकूने हल्ला केला. दरम्यान, आकाश सुरुवातीला आशुच्या हल्ल्यापासून वाचला, पण आशुने रिक्षात बसलेल्या शालिनीकडे वळून तिच्यावर बरेच वार केल्याचं पोलिसांनी सांगितलं. आकाश तिला वाचवण्यासाठी धावला पण त्याच्यावर सुद्धा खूप वार करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यामध्ये, आकाशने आशुवर चाकूने हल्ला केला आणि त्यात आकाशचा मृत्यू झाला.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आणखी एक मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार... कसा असेल रूट?
डॉक्टरांनी मृत घोषित केलं
शालिनीचा भाऊ रोहीत आणि काही स्थानिकांनी तिघांनाही रुग्णालयात नेलं आणि तपासादरम्यान डॉक्टरांनी शालिनी आणि आशुला मृत घोषित केलं. पोलिसांच्या तपासादरम्यान शालिनी गर्भवती होती, अशी माहिती समोर आली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित घटना कुतुब रोडजवळील एका परिसरात घडली. शालिनीच्या आईच्या म्हणण्यानुसार, काही वर्षांपूर्वी शालिनी आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरू होते आणि या काळात पीडिता आशुसोबत राहत होती.
हे ही वाचा: लातूर हादरलं, नर्स आणि MPSC करणाऱ्या अपंग तरुणाच्या प्रेमाला घरातून विरोध, दोघांची गळफास घेऊन आत्महत्या
पतीसोबतच्या वादामुळे लिव्ह-इन-पार्टनरसोबत राहिली...
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लिव्ह-इन-पार्टनरसोबत राहिल्याच्या काही काळानंतर, तिचा आकाशसोबत वाद मिटला आणि ती तिचा पती तसेच दोन्ही मुलांसोबत एकत्र राहू लागली. शालिनीच्या या वागण्यामुळे आशु प्रचंड संतापला आणि त्याने स्वत: शालिनीने जन्म दिलेल्या बाळाचा वडील असल्याचा दावा केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांच्या रिपोर्ट्सनुसार, आशुच्या नावावर नबी करीम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून आकाशवर सुद्धा तीन गुन्हे दाखल आहेत. तक्रारीच्या आधारे, पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 103-1 (हत्या) आणि 109-1 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.