आमदार संजय गायकवाड यांना महागडी Defender Car कुणी गिफ्ट दिली? किंमत ऐकून अवाक व्हाल

मुंबई तक

MLA Sanjay Gaikwad and Defender car : आमदार संजय गायकवाड यांना महागडी Defender Car कुणी गिफ्ट दिली? किंमत ऐकून अवाक व्हाल

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आमदार संजय गायकवाड यांना महागडी Defender Car कुणी गिफ्ट दिली?

point

भाजप नेत्याचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप

Maharashtra Politics : गेल्या दोन दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची डिफेंडर कार राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. बुलढाण्यातील भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी कसल्या कमिशनमधून हे कार खरेदी केली? असा सवाल केल्यानंतर संजय गायकवाड संतापले आहेत. संजय गायकवाड यांनी विजय शिंदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नेमकं हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात... 

दीड कोटींची कार गिफ्ट, कमिशनच्या पैशातून घेतल्याचा भाजपचा आरोप 

एकनाथ शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांची दिवाळी जोमात सुरु आहे. कारण संजय गायकडवाडांना तब्बल दीड कोटी रुपयांची कार त्यांना गिफ्ट मिळाली. त्यामुळे गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. संजय गायकवाडांचा या कारसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. भाजपने ही कार कंत्राटदाराकडून घेतलेल्या पैशातून घेतल्याचा आरोप केलाय. 

हेही वाचा : जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोप, मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच समोर, गोखलेंसोबतच्या भागिदारीवरुन सविस्तर भाष्य

भाजप नेते विजय शिंदे म्हणाले, मी दीड कोटीची डिफेंडर आणल्याचे बोलले गेले. ती डिफेंडर अजून तरी मला माहिती नाही कुठे आहे? मात्र, आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे. एका कंत्राटदाराच्या नावावर ही कार आलेली आहे. आज दाखल झालीये. ती डिफेंडर कोणा आहे? आणि कोणत्या कंत्राटदाराकडून कमिशन म्हणून मिळाली आहे? याचा शोध पत्रकारांनी घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, एवढा मोठा हा विषय नाही. त्यांच्यामागे महाराष्ट्राचे काम आहेत. हे तर इथला पीआय पण करु शकतो. 

हे वाचलं का?

    follow whatsapp