जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोप, मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच समोर, गोखलेंसोबतच्या भागिदारीवरुन सविस्तर भाष्य

मुंबई तक

Muralidhar Mohol press conferance, Pune : जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोप, मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच समोर आले, स्पष्टीकरण देताना काय म्हणाले?

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोप

point

मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच समोर आले, स्पष्टीकरण देताना काय म्हणाले?

Muralidhar Mohol press conferance, Pune : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातील जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोप करण्यात येतोय. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी आणि पुण्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मोहोळांवर गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूर्मीवर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मुरलीधर मोहोळ काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात... 

मुरलीधर मोहोळ स्पष्टीकरण देताना काय म्हणाले?

मुरलीधर मोहोळ म्हणाले, राजू शेट्टी यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे. ते मला दिल्लीत विविध कामांच्या निमित्ताने बोलत असतात, भेटत असतात. मात्र, इतका मोठा आरोप एका लोक प्रतीनिधीवर करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी बोलायला हवं होतं. तर मी त्यांना सत्य परिस्थिती समजावून सांगितली असती. पुण्यातील नेत्यांनी माझ्यावर आरोप केले. मी केवळ पुण्यातील लोकांसाठी स्पष्टीकरण देत आहे. जैन बोर्डिंगचं जे खरेदी खत झालं. पुण्यातील गोखले बिल्डर या व्यावसायिकाने ते घेतलं व्यवहार झाला. माझ्यावर आरोप केला की, मी गोखले बिल्डरचा पार्टनर आहे. मी लोकसभा निवडणुकीचं प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यामध्ये मी शेती आणि कंस्ट्रक्शनचा व्यवसाय करतो हे सांगितलं होतं. मी पुण्यात बांधकाम व्यावसायिक करतो. एका राजकारणी माणसाने व्यवसाय करु नये का? गोखलेंसोबत जो व्यवहार आहे. त्यांच्यासोबत भागिदारीच्या दोन फर्म होत्या. एक होती गोखले इस्टेट एलएलपी आणि दुसरी होती गोखले फिचर एलएलपी.. या दोन्ही ज्या भागिदारी संस्था आहे. यातील एक संस्था 3 ऑगस्ट 2022 ला आणि दुसरी संस्था 3 फेब्रुवारी 2023 ला तयार झाली. 2023 साली मी आणि विशाल गोखले आम्ही दोघांनी मिळून दोन एलएलपी केल्या. ते पब्लिक डॉक्यमेंट आहे. तुम्ही आज कुठेही जाऊन पाहू शकता. मी एलएलपी या बाहेर पडण्याआधी एकही रुपयाचा व्यवसाय किंवा प्रोजेक्ट झालेला नाही. हे तुम्ही तपासू शकता. आता जैन बोर्डिंगचा विषय आला, तेव्हा मी पार्टनरशिपमध्ये नव्हतो. या व्यवहारात गोखले पार्टनर आहेत आणि मुरलीधर मोहोळांची पार्टनरशिप असल्याचं बोललं जातंय. मी 25 नोव्हेंबर 2024 रोजी  या दोन्ही एलएलपीमधून राजीनामा देऊन बाहेर पडलो. त्याचं ऑफिशियल लेटर मी दाखवत आहे.  

पुढे बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, जैन बोर्डिंगच्या ट्रस्टींनी 16 डिसेंबर रोजी मिटिंग घेऊन जमीन विकासकाला देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अनेक वर्तमान पत्रांमध्ये याची टेंडर नोटीस काढली होती. ही 20-12-2024 रोजी काढली होती. गोखलेंनी ही जमीन विकत घेतली ती 8-10-25 रोजी ...मी बाहेर पडलो 25-11 2025 रोजी... म्हणजे 11 महिन्यापूर्वी ट्रस्टनी विकायचा निर्णय घेतला होता. मुरलीधर मोहोळचा या प्रकरणाशी सबंध कसा आला? पुण्यातील जैन बांधवांनी आरोप केलेला नाही. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. राजू शेट्टींनी माहिती न घेता आरोप केले. त्यानंतर पुण्यातील बिळात बसलेले उंदीर बाहेर आले आणि त्यांनी आरोप केले. 

राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कोणते आरोप केले होते?

सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा पैशाच्या हव्यासापोटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रेशीमबागेचा सुध्दा लिलाव काढायला भाजपचे मंत्री मागे पुढे बघणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहभागाने  पब्लिक ट्रस्टची ३००० कोटी मालमत्ता २३० कोटी हडपण्याचा  डाव उधळण्यासाठी जैन समाजासह इतर समाजाच्या सहकार्यातून मॅाडेल कॅालनी ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

हे वाचलं का?

    follow whatsapp