'तिचा तो त्रास अनेक दिवसांपासून', 5 वर्षीय मुलीसोबत आईने नको ते केलं; बाप हळहळला अन्..

मुंबई तक

crime news : एका महिलेनं आपल्याच पाच वर्षाच्या सावत्र मुलीला इलेक्ट्रिक इस्त्रीने चटके दिल्याचा आरोप आहे, नेमकं काय घडलं याची माहिती पुढीलप्रमाणे सांगण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलेनं पाच वर्षाच्या मुलीला दिले चटके

point

वडिलांनी पाहताच हळहळ व्यक्त केली

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका महिलेनं आपल्याच पाच वर्षाच्या सावत्र मुलीला इलेक्ट्रिक इस्त्रीने चटके दिल्याचा आरोप आहे. एका वृत्तमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी पोलिसांना मुलीच्या वडिलांकडून पीसीआर कॉल आला होता, त्यात त्यांना एकूण घटनेची माहिती दिली होती. ही मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना दिल्लीतील असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : अलिबाग हादरलं! तरुणाचा तरुणीवर होता 'तसला' संशय, बॉयफ्रेंडची सटकली अन् गर्लफ्रेंडच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करत...

अनेक दिवसांपासून त्रास

गाजीपूर मंडीमध्ये चिकन शॉपमध्ये चालवणाऱ्या या व्यक्तीने आपल्या तक्रारीत म्हटलं की, त्याच्या पहिल्या लग्नापासून त्याला एक मुलगी आहे, जी घटस्फोटानंतर संबंध संपला. त्याने आरोप केला की त्याच्या दुसर्‍या पत्नीला एक मुलगी आहे. तिने अनेकदा शारीरिक आणि मानसिक त्रास दिला होता. 

शेजाऱ्याचा फोन आला अन्...

तक्रारदाराने पोलिसांना सांगितले की, रात्री 1:30 वाजता ती कामावरून घरी परतत असताना, एका शेजाऱ्याचा एक फोन आला होता, त्यात एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याने तात्काळपणे घरी धाव घेतली आणि आपल्या मुलीला तरुणाने अस्वस्थ झालेलं पाहिलं.

हे ही वाचा : आईने पोटच्या मुलांचे उशीने तोंड दाबले, नंतर चौथ्या इमारतीवरून मारली उडी, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

हेच पाहून वडिलांचं काळीज पिळवटून निघालं होतं. तेव्हा त्याने आपल्या मुलीला एका रुग्णालयात दाखल केले. (BNS) कायद्यान्वये पोक्सो बाल न्याय कायद्याच्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि महिलेची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, मुलींवर महिलांवर दिल्लीत मोठ्या प्रमाणात अत्याचार होताना दिसतात.  तसेच रकाही कौटुंबिक हिंसाचाराच्याही घटना समोर येऊ लागल्या आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp