वडिलांनीच 9 वर्षाच्या मुलीला नको तेच दाखवले व्हिडिओ, नंतर... नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील लाज आणणारा प्रकार
Navi mumbai crime : नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे. वडिलांनीच आपल्याच 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला, एकूण प्रकरण काय जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात मन सुन्न करून टाकणारी घटना

एकूण प्रकरण काय?
Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे. वडिलांनीच आपल्याच 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. संबंधित प्रकरणात कोपरखैरणे पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोधा सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : पुणे हादरलं! दिवाळीचे फटाके खरेदी करायला 9 वर्षांची मुलगी एकटीच गेली, 63 वर्षीय फटाके विक्रेत्याने खोलीत नेत...
एकूण प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा आपल्या बायकोसह मुलीसोबत राहत होता. नराधम बापाने आपल्या 9 वर्षांच्या मुलीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत तिच्यासोबत अनेकदा वाईट कृत्य देखील केल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती मुलीच्या आईला कळताच तिने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान, पीडितेची आई ही मूळत: मूकबधिर असल्याने तिला पोलिसांशी फारसं बोलता आलं नाही. पण, त्यानंतर पोलिसांनी तज्ज्ञांच्या मदतीने संवाद करत तिच्याकडून एकूण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा : जालना हादरलं! सख्ख्या मामाने आपल्याच भाच्याच्या डोक्यात आणि पोटात रॉडने केला हल्ला, खूनाचं धक्कादायक कारण समोर
या एकूण तपासानंतर महिलेनं आरोप केला की, याआधी अनेकदा लैंगिक शोषण करण्यात आले होते. तिचा अनेकदा छळही करण्यात आला होता. यानंतर पोलीस म्हणाले की, आम्ही आरोपीवर करडी नजर ठेऊन आहोत, तसेच पुढील एकूण प्रकरण आणि तपास करण्याचा प्रयत्न करत असल्याचे कोपरखैरणे पोलिसांनी सांगितलं.