मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक, बाळाच्या हृदयाला छिद्र, महत्त्वाची माहिती समोर
Mumbai news : मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर एका तरुणाने डॉक्टरकीचं कसलंही प्रशिक्षण घेतलं नसताना एका महिलेची प्रसुती केली. पण, आता त्याच बाळाची प्रकृती स्थिर नसल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक

बाळाला नेमकं काय झालं?
Mumbai news : मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर एका तरुणाने डॉक्टरकीचं कसलंही प्रशिक्षण घेतलं नसताना एका महिलेची प्रसुती केली. थ्री इडियट्स चित्रपटातील रँचोने जे केलं होतं, तेच आता संबंधित तरुणाने करून दाखवलं. याच खऱ्या आयुष्यात तोच रँचो हिरो ठरला असून त्याचे नाव विकास बेद्रे असे आहे. पण, आता नुकत्याच जन्मलेल्या बाळाची प्रकृती स्थिर नसल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : पैसा-पाणी: सोनं, चांदी की शेअर कशातून मिळेल सर्वाधिक पैसा.. संवत् 2082 मध्ये काय होईल?
बाळाला नेमकं काय झालं?
हे बाळ सध्या कपूर रुग्णालयात असून त्याच्यावर अतिदक्षचा विभागात उपचार सुरु करण्यात आले आहेत. बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे सांगण्यात येत आहे. आईची प्रकृती स्थिर असली तरीही बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
राम मंदिर स्टेशनवर गुरुवारी रात्री 12:40 वाजताच्या सुमारास एका गर्भवती महिलेची प्रसुती झाली. ही प्रसुती दुसरी तिसरी कोणीही केली नसून विकास बेद्रे नावाच्या तरुणाने केली. महिला जेव्हा ट्रेनमध्ये होती तेव्हा तिला प्रचंड वेदना झाल्या होत्या. तेव्हाच तरुणाने अपत्कालीन परिस्थितीत ट्रेनची चैन ओढली असता, राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली.
हे ही वाचा : ऐन दिवाळीत मोठी दुर्घटना, छठपूजेला जाताना एक्सप्रेसमधून पडून दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
तेव्हा तरुणाने आपल्या डॉक्टर मैत्रिणीला फोनद्वारे संपर्क केला. डॉक्टर देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांनी विकास बेद्रेला व्हिडिओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया दिली. विकासला कोणत्याही वैद्यकीय शिक्षणाचा अनुभव नव्हता डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे पालन केले. त्यानंतर त्याच्या प्रयत्नाला यश आले आणि महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिला.